IEC 2022: टाईम्स नेटवर्कचा महत्त्वाचा कार्यक्रम 'इंडिया इकोनॉमिक कॉन्क्लेव 2022' ची आज मुंबईत सुरूवात झाली आहे. यावेळेस या कार्यक्रमाची थीम 'द ग्रेट इंडियन डेमोक्रेटिक डिविडेंड'आहे. यात विविध क्षेत्रातील दिग्गज आर्थिक अजेंड्यावर चर्चा करणार आहेत. यात पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात इंडियन टेलिव्हिजन प्रॉड्युसर एकता कपूरचा समावेश होता. त्यांनी फिल्म कंटेट, जेंडर इंटेलिजेन्स यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. women boss is necessary in office says ekta kapoor
अधिक वाचा - किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला का अलविदा केलं
एक महिलेच्या नात्याने जर कोणी कंटेट क्रिएटर, फिल्मनिर्माती असेल तर काय पुरुषांच्या तुलनेत वेगळ्या प्रकारचे स्किलची गरज अथवा कोणता अॅडव्हान्टेज आणि डिसअँडव्हांटेज आहे? यावर एकता कपूरने सांगितले की हे सब्जेक्टिव्ह आहे. जर तुम्ही टेलिव्हिजन जगतातबाबत बोलत आहात तर हे स्किल आहे. जिथे महिला लेखक असतात तर या गोष्टी एक महिला स्वाभाविकपणे चांगल्या पद्धतीने समजते. मात्र पुरुषांना महिलांची बुद्धी समजून घ्यावी लागते. मात्र सिनेमाबाबत बोलायचे झाल्यास येथे पुरुष लेखक जास्त आहेत तर महिला सिनेनिर्माती -कंटेट क्रिएटरला हे समजून घ्यावे लागेत. दुर्भाग्याने ही मोठी सीमा आहे आणि आम्ही हे सातत्याने सीमोल्लंघन करत आहोत. कारण टेलिव्हिजन पुरुषांसाठी आहे आणि सिनेमे महिलांसाठीही आहेत. यासाठी कोणते वेगळे स्किल नाही तर हे एक मल्टिटास्किंग आर्ट आहे.
एकता कपूरने पुढे सांगितले की मी आयुष्याला पुरुष आणि महिलेच्या नजरेने बघत नाही. महिला होण्याच्या नाते मला केवळ हे करायचे आहे अथवा पुरुष असल्याच्या नात्याने मला केवळ हे करायचे आहे असे नाही. आपल्याला एक माणूस म्हणून जगायचे आहे. प्रत्येक आयुष्याला सेलिब्रेट केले पाहिजे..तुम्हाला स्क्रीनवर मेल आणि फिमेल दोन्ही कॅरॅक्टर्सना सेलिब्रेट केले पाहिजे.
मी खूप तरूण वयात काम सुरू केले होते. एक महिला असल्याने खूप काही पाहिले आहे. महिला बॉस ऑफिसमध्ये असणे गरजेचे असते. कारण तुम्ही काही गोष्टींमधून जाता तेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या समस्या समजतात. मुले झाल्यानंतर मला महिला आणि आईबाबतच्या अनेक गोष्टी समजल्या. अखेर ती फिलिंग काय असते हे समजले. जेव्हा तुमच्या बाळाची तब्येत खराब असते आणि तेव्हा तुम्ही एका कॉलवर ऑफिस सोडून पळता.
अधिक वाचा - मंत्री धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करणार्या रेणू शर्माला अटक
जेंडर इंटेलिजेन्सबाबत एकता कपूरचे म्हणणे आहे की टीव्हीने एक व्हॉईस क्रिएट केला आहे. किचन पॉलिटिक्स हे वास्तव आहे. म्हणूनच यावर अनेक कहाण्या बनल्या. अनेक महिलांना टेलिव्हिजनच्या माध्यमातून आवाज मिळाला. माझ्या मते जेंडर इंटेलिजेव्स मेकर्समध्ये जास्त असली पाहिजे. डर्टी पिक्चर अशीच एक कहाणी होती. यात आम्ही एंटरटेनिंग बनवून खरी गोष्ट सेक्सुलिटीसोबत लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की सेक्स तुम्ही सगळे पाहता आणि डर्टी मी... कुठे ना कुठे आम्ही लोकांचा माईंडसेट बदलण्याचा प्रयत्न केला आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.