Raj Thackeray appeal to women's: महिला दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट, महिलांना केलं खास आवाहन

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 08, 2023 | 11:58 IST

Raj Thackeray : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट करत महिलांना खास आवाहन केलं आहे. 

Womens day 2023 mns chief raj thackeray appeal womens to join politics read his full post in marathi
Raj Thackeray appeal to women's: महिला दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट, महिलांना केलं खास आवाहन 
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरेंचं फेसबूक पोस्टच्या माध्यमातून महिलांना आवाहन
  • राज ठाकरेंच्या फेसबूक पोस्टमध्ये महिलांच्या प्रगतीचा उल्लेख

Raj Thackeray appeal to Women's: 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या जात आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena Chief Raj Thackeray) यांनीही सोशल मीडियात एक पोस्ट करुन महिलांना खास आवाहन केलं आहे.

नेमकं काय म्हटलंय राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये?

राज ठाकरेंनी म्हटलं, "आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.

100,150 वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे.

हे पण वाचा : किवी खाण्याचे आरोग्यदायक फायदे

म्हणूनच आता स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. 'जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं' हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे.

पुन्हा एकदा सर्व महिलांना, जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी