शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना Y+ सुरक्षा, अमृता फडणवीसांनाही एस्कॉर्टची सुविधा

Escort Security : राज्य गुप्तचर विभागाच्या रिपोर्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा दिली जात होती आता वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Y+ Escort Security to Amrita Fadnavis and Chandrasekhar Bavannakule
शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना Y+ सुरक्षा, अमृता फडणवीसांनाही एस्कॉर्टची सुविधा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाविकास आघाडीच्या 15 नेत्यांची सुरक्षा काढली
  • मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा शिंदे सरकारने वाढवली
  • अमृता फडणवीसांनी वाय प्लस सुरक्षा

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील गृह विभागाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्व ४१ आमदारांना आणि लोकसभेच्या १० खासदारांना विशेष Y+ सुरक्षा पुरवली आहे. या निर्णयातील विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्यांच्यासाठी नवीन स्कॉट व्हेईकल (ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईकल) देखील मंजूर करण्यात आले आहे. (Y+ Escort Security to Amrita Fadnavis and Chandrasekhar Bavannakule)

अधिक वाचा : Crop insurance 509 दिवसांपासून सुरु असलेल्या पिकविम्याच्या लढाईला अखेर यश, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही होतायेत जमा

गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर आता त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून अमृता फडणवीस जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन देखील असेल. वाय प्लस सिक्युरिटीनुसार अमृता फडणवीस यांच्याकडे आता एक एस्कॉर्ट व्हॅन आणि पाच पोलीस कर्मचारी असतील. अमृता फडणवीस यांच्यासोबत २४ तास पोलिस बंदोबस्त असेल. तर ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन हे पायलट व्हॅनप्रमाणे काम करेल. त्यामुळे अमृता फडणवीस प्रवास करत असताना संबंधित परिसरात रस्ता मोकळा राहील याची काळजी घेतली जाईल.

अधिक वाचा : Sanjay Raut यांना मिळणार जामीन? या दिवसापर्यंत ठेवला न्यायालयाने ठेवला निकाल राखून

एकनाथ शिंदे, फडणवीस आणि राज्यपाल बीएस कोश्यारी यांचे Z+ कव्हरही कायम ठेवण्यात आले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय आणि शिंदे यांचा आमदार मुलगा खासदार श्रीकांत यांच्या Y+ कव्हरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांमध्ये रामटेक लोकसभा सदस्य कृपाल तामाणे यांचा समावेश आहे, त्यांची सुरक्षा राज्याच्या गृह विभागाने वाढवली आहे. भ्रष्टाचारविरोधी लढवय्ये अण्णा हजारे यांची झेड श्रेणीची सुरक्षा कायम राहणार आहे.

अधिक वाचा : Nashik: शिवशाही पेटली, नाशिकध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; 45 प्रवासी बचावले

माजी शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या गुन्ह्याची चौकशी करणारे न्यायमूर्ती केयू चांदीवाल यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एस्कॉर्टसह वाय प्लस कव्हर देण्यात आले आहे. अंबानी कुटुंबाला Z+ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे, तर अभिनेता सलमान खानला एका एस्कॉर्टसह Y+ सुरक्षा कवच देण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी