Yashomati Thakur । मुंबई : अनिल बोंडेंच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, म्हणून असा काही विक्षिप्त ते बोलत असतात. अनिल बोंडे सातत्याने अमरावतीत अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. लोकांना उद्युक्त करण्याचा, तसेच जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या. (Yashomati Thakur criticizes BJP's Anil Bonde)
माझं अमरावतीच्या जनतेला म्हणणं आहे की, अनिल बोंडेंकडे दुर्लक्ष करा. आपल्या अमरावतीचा सलोखा महत्वाचा आहे, असेही आवाहन ठाकूर यांनी केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांची ही कर्मभूमी आहे आणि आपण सर्व धर्म समभाव या विचारांची लोकं आहोत, त्यामुळे आपण शांतता राखावी आणि सलोखाही राखून ठेवावा.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.