मुंबई : राज्यात पुढच्या दोन दिवसांत जोरदार पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. मध्य भारतातील (Central India) कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भापाठोपाठ, उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), मुंबई (Mumbai), उत्तर कोकणात (North Konkan) जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची चिन्हे आहेत. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा 'यलो अलर्ट' आहे.
कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून तीव्र कमी दाब क्षेत्र ते अग्नेय बंगाल उपसागरापर्यंत कायम आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत पाऊस उत्तरेकडे जाण्याचे संकेत आहेत. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य भारतातील कमी दाब क्षेत्र पूरक ठरल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह उत्तर कोकणात पावसाने जोरदार बॅटिग केली आहे. मंगळवारी विदर्भात पाऊस ओसरला होता. तर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस वाढल्याचे दिसून आले.
Read Also : लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज करा या फळांचे सेवन
मध्य महाराष्ट्रात कमी-अधिक स्वरूपात श्रावण सरी कोसळत आहेत. आज पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. उत्तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश परिसरावरील तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) मंगळवारी पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशावर होते. या प्रणालीची तीव्रता ओसरण्यास सुरूवात झाली आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
Read Also : विना मास्क विमान प्रवास करणाऱ्यांवर होणार कारवाई
शुक्रवारपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. यानुसार, राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात किरकोळ पाऊस होणार आहे.
कोकणात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. नागपूर विभागामध्ये गेल्या 24 तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील 18 तर भंडारा जिल्ह्यातील 78 रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीकरिता बंद करण्यात आले आहेत. या भागात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत मदतकार्य सुरु आहे. राज्यात अन्यत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. राज्यात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या विभागात कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असून कुठेही गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही.
Read Also : फडणवीसांच्या भेटीसाठी मोहित कंबोज आणि रश्मी शुक्ला ‘सागर’वर
जिल्ह्यातील अनेक मध्यम धरणे शंभर टक्के भरली असून, धरणांमधील एकूण सरासरी जलसाठा 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गंगापूर धरण 94 टक्के भरल्यामुळे मंगळवार दुपारपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर बुधवारी सकाळी 3000 क्यूसेकने विसर्ग वाढवण्यात आल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
धरणांमधील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून एकूण 47 हजार 760 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर धरणाजवळील पैठण-शेवगावला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.