Yes Bank Fraud Case : यस बँक घोटाळा प्रकरणी अविनाश भोसलेंच्या मालमत्तेवर सीबीआयची धाड

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 30, 2022 | 18:18 IST

Yes Bank Fraud Case CBI raids eight locations in mumbai and pune : यस बँक घोटाळा प्रकरणी अविनाश भोसले आणि शाहिद उस्मान बलवा यांच्या मालमत्तेवर सीबीआयची धाड पडली आहे. मुंबई आणि पुण्यात वेगवेगळ्या आठ ठिकाणी सीबीआयची कारवाई सुरू आहे. 

Yes Bank Fraud Case CBI raids eight locations in mumbai and pune
यस बँक घोटाळा प्रकरणी अविनाश भोसलेंच्या मालमत्तेवर सीबीआयची धाड  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • यस बँक घोटाळा प्रकरणी अविनाश भोसलेंच्या मालमत्तेवर सीबीआयची धाड
  • मुंबई आणि पुण्यात वेगवेगळ्या आठ ठिकाणी सीबीआयची कारवाई सुरू
  • नवे गौप्यस्फोट होण्याची शक्यता

Yes Bank Fraud Case CBI raids eight locations in mumbai and pune : मुंबई : यस बँक घोटाळा प्रकरणी अविनाश भोसले आणि शाहिद उस्मान बलवा यांच्या मालमत्तेवर सीबीआयची धाड पडली आहे. मुंबई आणि पुण्यात वेगवेगळ्या आठ ठिकाणी सीबीआयची कारवाई सुरू आहे. 

यस बँकेकडून डीएचएफएलने मोठे कर्ज घेतले आणि फेडले नाही. यामुळे आर्थिकदृष्ट्या यस बँक अडचणीत सापडली. ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरल्याप्रकरणी रेडियस ग्रुप आणि डीएचएफएलच्या संजय छाबडिया यांना सीबीआयने गुरुवार २८ एप्रिल २०२२ रोजी अटक केली. स्पेशल कोर्टाने छाबडिया यांना शुक्रवार २९ एप्रिल २०२२ रोजी ६ मे २०२२ पर्यंत सीबीआय कोठडी दिली. यानंतर छाबडिया यांच्याकडून मिळालेल्या माहितीआधारे सीबीआयने मुंबई आणि पुण्यातील मालमत्तांवर धाड टाकली. 

डीएचएफएलचे कपिल वाधवान आणि धीरज वाधवान आधीपासूनच तुरुंगात आहेत. यस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याशी हातमिळवणी करुन कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी ते तुरुंगात आहेत. आता सीबीआयने मुंबई आणि पुण्यात धाड टाकली आहे. यामुळे आणखी नवे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

यस बँक घोटाळा

डीएचएफएलने यस बँकेकडून डिबेंचर घेतले. नंतर मोठ्या रकमेचे कर्ज मिळावे म्हणून डीएचएफएलने कपूर दाम्पत्याला आर्थिक लाभ मिळवून दिला होता. या प्रकरणात सीबीआयने पहिला गुन्हा मार्च २०२० मध्ये दाखल केला. तेव्हापासून तपास सुरू आहे. या प्रकरणात मुंबई पुण्यात सीबीआयच्या धाडी पडल्यामुळे तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी