Toll: मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात जोरदार भाषण करत आपल्या कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले. यावेळी आपण कोणतंच आंदोलन सोडलं नाही. ते लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे असे आदेशही राज ठाकरेंनी यावेळी दिले आहेत. याचवेळी राज ठाकरेंनी असंही म्हटलं की, राज्यातील ६० ते ६५ टोल (Toll) आपण बंद झाले. जर माझ्या हातात सत्ता दिली तर राज्यातील सर्व टोल आपण बंद करु असं ते म्हणाले. (you give me power i will stop all tolls in maharashtra said raj thackeray)
पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले:
'माझी नुकतीच शस्त्रक्रिया झाली. आता मी बरा आहे. पण जवळच्या आणि बाहेरच्यांनी दिलेल्या दुखण्यामुळेच हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करावी लागली.' अशी मिश्किल टोलेबाजी राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच केली.
अधिक वाचा: बाळासाहेबांचा तो किस्सा जो राज ठाकरेंनी आजवर सांगितला नव्हता
'मनसेविरोधात खोटा प्रचार सुरु आहे'
'काही जणं प्रचार करत आहेत की, राज ठाकरे आणि त्यांचा मनसे पक्ष आंदोलनं अर्धवट सोडतो. एक आंदोलन दाखवायचं जे आपण अर्धवट सोडलं. टोलचं केलेलं आंदोलन... आपण जवळजवळ ६५ ते ६७ टोलनाके महाराष्ट्रातले बंद केले आपण. ज्या शिवसेना-भाजपच्या जाहीरनाम्यात दिलं होतं की, आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करु त्यांना यांच्यापैकी कोणी जाऊन एक प्रश्न विचारत नाही. पण आपल्याबद्दल खोटा प्रचार करणार.' असं म्हणत राज ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला.
'माझा हातात सत्ता द्या .. बाकीचे टोल बंद करुन टाकतो'
'एवढी वर्ष टोल सुरु आहेत. ती सगळी कॅश जमा होतो. ही कॅश जाते कुठे?.. माझा हातात सत्ता द्या .. बाकीचे टोल बंद करुन टाकतो. पण टोलचा पैसा या सगळ्यांकडे जातात आणि म्हणून ते त्यांना बंद करायचे नाहीएत. म्हणून तो विषय पण काढत नाहीत.' असं मोठं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं आहे.
अधिक वाचा: Raj Thackeray : विधानसभेच्या पुढील निवडणुका कधी, राज ठाकरेंनी सांगितला महिना
पदाधिकाऱ्यांनाही दिल्या कानपिचक्या
'भोंग्यांबद्दलचं आंदोलन... पोलिसांनी दिलेला आकडा... जवळजवळ ९२-९३ टक्के ठिकाणी भोंगे बंद झाले सकाळचे आणि बाकीचे आहेत. ज्या काही प्रार्थना होतात. त्या अगदी कमी आवाजात होतात. त्याच बद्दलचे माझं पत्र होतं. काही पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात फक्त निवडणुकीचे वारे आहेत. पक्ष नाही संघटना नाही..' असं म्हणत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.