मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण (bow and arrow)हे निवडणूक चिन्ह दिलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. या धक्क्यातून उद्धव ठाकरे गट सावरण्याचा प्रयत्न करत आहे, तितक्यात एकनाथ शिंदेंनी आपला पुढचं टार्गेट निश्चित केलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे हाती धनुष्यबाण येताच बरोबर एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray)युवासेनेवर निशाणा लावला आहे. ( After taking the bow, Eknath Shinde targets Aditya Thackeray )
अधिक वाचा : तुम्हाला परीक्षेत टॉपर व्हाययंच मग लावा या सवयी
दरम्यान शिवसेना हे नाव आणि पक्ष चिन्हाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. एकनाथ शिंदेंच्या धक्क्याला उत्तर देण्यासाठी ठाकरे गट तयारी करत आहे. पण त्याआधीच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुढचा धक्का दिला आहे. शिंदे आदित्य ठाकरेंची युवासेना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
अधिक वाचा : Daily Horoscope 19 February 2023: मिथुन, मीनसह या 6 राशींना होणार आर्थिक लाभ
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांची पुढची स्ट्रॅटेजीही ठरली आहे. येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाची बैठक बोलवतील. या बैठकीमध्ये सगळ्यात आधी पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जातील. या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांना नेमकं कोणतं पद दिलं जातं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अधिक वाचा : shivaji jayanti 2023: या मुद्द्यांनी समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांची महानता
सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना मुख्यनेते हे पद आहे. 23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुखाचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपला होता. त्यामुळे शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका या प्रलंबित आहेत, याच निवडणुका घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना सगळ्यात आधी बैठक बोलवावी लागेल.
एकनाथ शिंदे यांनी युवासेना-युवती कार्यकारिणीची नियुक्ती केली आहे. या कार्यकारिणीमध्ये 10 युवतींचा समावेश आहे. शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रात एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मुख्यनेते म्हणून करण्यात आला आहे. डॉ.प्रियंका पाटील, पूजा टांकसाळकर, प्रज्ञा बनसोडे, स्नेहल कांबळे, शर्मिला येवले, शर्वरी गावंडे, क्षितीजा कांबळे, पूजा लोंढे, श्वेता म्हात्रे, शिवानी खानविलकर या 10 जणींचा कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.