ठाण्यातील मोर्चात अस्वस्थ अन् थोड्याच वेळात ठाकरेंच्या कट्टर समर्थक दुर्गा भोसलेंचं निधन

मुंबई
सुनिल देसले
Updated Apr 06, 2023 | 14:54 IST

Durga Bhosale Shinde: ठाण्यातील जनआक्रोश मोर्चात युवासेना सचिव दुर्गा भोसले शिंदे या सहभागी झाल्या होत्या. मात्र, मोर्चा सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि नंतर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

Yuva sena Secretary durga bhosale shinde dies after heart attack during jan aakrosh morcha in thane read details in marathi
ठाण्यातील मोर्चात अस्वस्थ अन् थोड्याच वेळात ठाकरेंच्या कट्टर समर्थक दुर्गा भोसलेंचं निधन  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • ठाण्यातील जनआक्रोश मोर्चात दुर्गा भोसले झाल्या होत्या सहभागी
  • घोषणा देता-देता दुर्गा भोसले यांना अस्वस्थ वाटू लागले
  • उपचार सुरू असताना दुर्गा भोसलेंचं अचानक निधन

Thackeray group Yuva Sena Secretary Durga Bhosale Shinde dies in Thane: ठाण्यातील ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्या प्रकरणाच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. या जनआक्रोश मोर्चात केवळ ठाण्यातूनच नाही तर मुंबईतूनही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. (Yuva sena Secretary durga bhosale shinde dies after a heart attack during jan aakrosh morcha in thane read details in marathi)

या मोर्चात युवासेनेच्या दुर्गा भोसले शिंदे यांनीही सहभाग घेतला होता. मुंबईत राहणाऱ्या दुर्गा भोसले यांची ओळख युवासेनेतेली रणरागिणी अशी होती. जनआक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या दुर्गा भोसले यांनी आपल्या सहकारी महिला, पदाधिकाऱ्यांसोबत जोरदार घोषणा सुद्धा दिल्या.

हे पण वाचा : अंड्यासोबत हे पदार्थ खाणे टाळा अन्यथा होईल घोटाळा

जनआक्रोश मोर्चातून चालत जात असताना दुर्गा भोसले शिंदे यांनी जोरदार घोषणा दिल्या. मात्र, घोषणा देत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दुर्गा भोसले यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

हे पण वाचा : झटपट नोकरी बदलावी की नाही?

दुर्गा भोसले यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दुर्गा भोसले या अवघ्या 30 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दुर्गा भोसले यांच्या पार्थिवावर वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हे पण वाचा : रात्री इनरवेअर घालून झोपावे की नाही?

आदित्य ठाकरेंचं ट्विट

दुर्गा भोसले यांच्या निधनानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, काल आम्ही आमचा सर्वात मेहनती, उत्साही, दयाळू, संवेदनशील   युवासैनिक गमावला. दुर्गा भोसले-शिंदे जी आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणे अतिशय कठीण आणि दुःखद आहे. एक युवासैनिक आणि मित्र म्हणून त्यांचे जाणे माझ्यासाठी शब्दांत व्यक्त करणे, शक्यच नाही. ॐ शांती!

दुर्गा भोसले यांच्या निधनाचं वृत्त ऐकल्यावर मन सुन्न झालं. एक अत्यंत मेहनती आणि दयाळू युवासैनिक आम्ही गमावला. शोक व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी