Sambhjajiraje Bhosale : हरहर महादेव चित्रपटाला सेन्सॉरने परवानगी दिलीच कशी? छत्रपती संभाजीराजे यांचा सवाल

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati  : हरहर महादेव चित्रपटाला सेन्सॉरने परवानगी दिलीच कशी? असा सवाल माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. तसेच महाराजांचे असे दैवतीकरण करणे चुकीचे आहे. यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत अशी संभाजीराजे म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • हरहर महादेव चित्रपटाला सेन्सॉरने परवानगी दिलीच कशी?
  • असा सवाल माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.
  • महाराजांचे असे दैवतीकरण करणे चुकीचे आहे.

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati  : रायगड : हरहर महादेव चित्रपटाला सेन्सॉरने परवानगी दिलीच कशी? असा सवाल माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. तसेच महाराजांचे असे दैवतीकरण करणे चुकीचे आहे. यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत अशी संभाजीराजे म्हणाले. (Yuvraj Sambhajiraje Chhatrapati will met cm ekanth shinde and deputy cm devendra fadanvis over harhar mahadev movie controversy)

रायगडमध्ये पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे भोसले म्हणाले की, शिवाजी महाराजांनी अफजलखानाला हिरण्यकशिपू प्रमाणे मांडीवर घेऊन कोथळा बाहेर काढला असे दाखवण्यात आले. शिवाजी महाराज हे सगळ्यांचे दैवत आहेत, परंतु चित्रपटात शिवाजी महाराजांना नरसिंहाच्या अवताराप्रमाणे दाखवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती होते त्यांनी असामान्य असे कार्य केले असे संभाजीराजे म्हणाले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक गोष्टी आहेत त्या दाखवता येतील पण असे चित्रीकरण दाखवणे चुकीचे आहे. सेन्सॉर बोर्डाने अशा चित्रपटाला परवानगी दिलीच कशी? असा सवाल करत सेन्सॉर बोर्डाकडे आम्ही मागणी केली आहे की, एक ऐतिहासिक चित्रपटासंबंधित एक समिती नेमावी. यासंबंधित मी १६ तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. महाराष्ट्रात जे चाललेले आहे ते अशोभनीय आहे असेही संभाजीराजे यांनी यावेळी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी