Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सिक्युरिटी दिली होती, शरद पवार यांची माहिती

नक्षलवाद्यांनी धमकी दिल्यानंतरही एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्यात आली नव्हती असा आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि शिंदे गटातील आमदार शंभूराजे देसाई यांनी केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सिक्युरिटी दिली होती अशी माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून आपण ही माहिती घेतली असेही पवार म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सिक्युरिटी दिली होती
  • अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
  • माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून आपण ही माहिती घेतली असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar : मुंबई : नक्षलवाद्यांनी (Naxalite) धमकी दिल्यानंतरही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना झेड प्लस सिक्युरिटी (z plus security) देण्यात आली नव्हती असा आरोप माजी गृहराज्यमंत्री (Ex home state minister) आणि शिंदे गटातील आमदार शंभूराजे देसाई (Shambhu raje desai) यांनी केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सिक्युरिटी दिली होती अशी माहिती शरद पवार(Sharad Pawar) यांनी दिली. तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Ex Home Minister) यांच्याकडून आपण ही माहिती घेतली असेही पवार म्हणाले. (z plus security was give to eknath shinde says ncp chief sharad pawar)

अधिक वाचा : CM Eknath Shinde: शिंदेचा दानवेंवर पलटवार, 'तो काय त्यांचा बॉस आहे...'

एका कार्यक्रमानंतर पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा पवार म्हणाले की, आजच सकाळी माझी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट झाली. त्यानं मी विचारलं की शिंदे साहेबांना तुम्ही झेड प्लस सिक्युरिटी दिली होती का? त्यावर वळसे पाटील यांनी झेड प्लस सिक्युरिटी दिल्याचे सांगितले. मी स्वतः माजी गृहमंत्री यांच्याकडून ऐकले होते. म्हणुन या विषयावर अधिक चर्चा करणे मला योग्य वाटत नाही असे पवार म्हणाले.

अधिक वाचा : Aaditya Thackeray: 'मातोश्रीचे दरवाजे कधीच कोणासाठी बंद नाही' ठाकरेंची शिंदे गटासोबत चर्चेची तयारी

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पवार म्हणाले की संपूर्ण सरकार केंद्रित ठेवून दोघांनी चालवायची ही भूमिका त्यांनी स्वीकारलेली दिसते आणि त्याला त्यांच्या राज्याच्या सहकाऱ्यांची आणि केंद्रीय सहकाऱ्यांची आणि नेतृवाची सहमती आहे. ते सत्ताधारी आहे ते जे करतील ते आपल्याला स्वीकारावं लागेल असे पवार म्हणाले.

अधिक वाचा : Suhas Kande: शिवसेनेच्या बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर प्रचंड खळबळजनक आरोप

नितेश राणे यांच्या आरोपावर पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की मुलं बाळांच्या प्रतिक्रियावर मी उत्तर देणं योग्य दिसत नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. मला वस्तुस्थिती माहीत नाही पण शासनात अनेक वर्ष काम केल्यानंतर मला एक गोष्टीची माहिती आहे की, सुरक्षा कोणाला द्यायची, कोणाला नाही द्यायची याबाबत कॅबिनेट मध्ये चर्चा होत नाही. ही चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिव हे गृह सचिव, डिजी अशा वरिष्ठ अधिकार्‍यांची एक समिती असते आणि त्या पुढे निर्णय आणि शिफारशी केल्या जातात असेही पवार यांनी नमूद केले.

अधिक वाचा : Aarey Metro Car Shed: आरे कारशेडचा मार्ग मोकळा, कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उठवली

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी