जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षण जाहीर, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 19, 2019 | 20:48 IST

ZP President Reservation in Maharashtra: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले आहे.

zilla parishad adhyakha president reservation full information maharashtra news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षण जाहीर, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती 

थोडं पण कामाचं

 • राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर
 • ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षण जाहीर
 • मुंबईत सकाळी झाली आरक्षणाची सोडत

मुंबई: राज्यातील महानगरपालिकांमधील आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता मंगळवारी जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील मुंबई शहर आणि उपनगर वगळता इतर ठिकाणी एकूण ३४ जिल्हा परिषदा आहेत. या सर्व ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले.

पाहूयात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसाठीचे आरक्षण

 1. अहमदनगर - सर्वसाधारण (महिला) 
 2. औरंगाबाद - सर्वसाधारण (महिला) 
 3. अकोला - सर्वसाधारण 
 4. अमरावती - नागरिकांचा मागास प्रवर्ग 
 5. बुलढाणा - सर्वसाधारण (महिला) 
 6. बीड - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 
 7. भंडारा - सर्वसाधारण 
 8. चंद्रपूर - सर्वसाधारण (महिला) 
 9. गडचिरोली - सर्वसाधारण 
 10. गोंदिया - सर्वसाधारण 
 11. नागपूर - अनुसूचित जाती (महिला) 
 12. हिंगोली - अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) 
 13. नांदेड - अनुसूचित जमाती (महिला) 
 14. उस्मानाबाद - अनुसूचित जाती (महिला) 
 15. लातूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग 
 16. जालना - अनुसूचित जाती 
 17. जळगाव - सर्वसाधारण (महिला)
 18. नंदुरबार - अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) 
 19. नाशिक - सर्वसाधारण (खुला प्रवर्ग)
 20. धुळे - सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) 
 21. कोल्हापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग 
 22. परभणी - सर्वसाधारण (महिला) 
 23. वर्धा - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 
 24. वाशिम - ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) 
 25. यवतमाळ - सर्वसाधारण (महिला)
 26. पुणे - सर्वसाधारण (महिला) 
 27. सोलापूर - अनुसूचित जाती  
 28. सांगली - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 
 29. सातारा - सर्वसाधारण 
 30. सिंधुदुर्ग - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 
 31. रत्नागिरी - सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) 
 32. रायगड - अनुसूचित जमाती (महिला)
 33. ठाणे - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 
 34. पालघर - अनुसूचित जमाती (महिला) 

काही दिवसांपूर्वीच राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यानुसार, मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर, सांगली, उल्हासनगर या महानगरपालिकांचे महापौरपद सर्वसाधरण (खुला) प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी