LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Nana Patole Vs BJP : नाना पटोलेविरोधात भाजप आक्रमक, राज्यभरात आंदोलन

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक प्रचार दरम्यान केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात पडसाद पडत आहे.

Nana Patole and Narendra modi
फोटो सौजन्य:  BCCL
नाना पटोले आणि नरेंद्र मोदी

मुंबई :   काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक प्रचार दरम्यान केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात पडसाद पडत आहे. मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले म्हणाले होते. पण मी गावगुंड मोदीबद्दल बोललो होतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल हे विधान केले नव्हते असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे. 

पण, असे असताना राज्यभरातून भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यातील विविध शहरात आंदोलन केले आहे. 

Jan 18, 2022  |  06:09 PM (IST)
Wardha : भाजयुमो तर्फे नाना पटोले यांच्या  पुतळ्याचे दहन

वर्धा :  भाजयुमो वर्धा जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांच्या नेतृत्वात सोशालिस्ट चौक येथे कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा पेटवण्यात आला. नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बेताल वक्तव्य करत आपले संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवली आहे.

Jan 18, 2022  |  06:08 PM (IST)
BJP Agitation in Nashik : नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी यांनी नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन केले.यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान यांच्याबाबत अपशब्द वापरून त्यांचा अपमान केल्याचा आरोप करत आज नाशिकमध्ये देखील भाजप पदाधिकारी यांनी पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध  आंदोलन केले,सातपूर येथील भाजप आमदार सीमा हिरे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या पंतप्रधानांबाबतच्या केलेल्या विधानाचा निषेध केला,तर राज्यभर गुन्हे दाखल करून नाना पटोले यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी नाशिक भाजप पदाधिकारी यांनी केली आहे.

Jan 18, 2022  |  06:06 PM (IST)
Anil Bonde Arrest Demand : नाना पटोले यांचा पंजा छाटनार अशी भाषा करणाऱ्या अनिल बोंडे यांना तात्काळ अटक करा

अमरावती : काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी  नरेंद्र मोदी यांना मी मारू शकतो अशी स्लीप व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटत असताना नाना पटोले यांचे हात छाटण्यासाठी अमरावती वरून पोरं निघाली आहे त्यांनी आपला पंजा सांभाळून ठेवावा असे वक्तव्य माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केले असताना अमरावती येथे काँग्रेसकडून पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून अनिल बोंडे यांनी पाठवलेली पोर कुठपर्यंत आहे त्यांचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे त्यापूर्वी अनिल बोंडे यांना पोलिसांनी अटक करावी अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते दिलीप ऐडतरकर यांनी केली,

त्यांना जर अटक झाली नाही आणि नाना पाटोले यांना जर काही धोका झाला तर येथील पोलिस त्यांला जबाबदार असतील, नाना पटोले यांनी फक्त मोदींचा उल्लेख केला आहे त्यांनी नरेंद्र मोदी असा उल्लेख कुठेही केलेला नाही त्यामुळे भाजपाने हे स्वतःच्या अंगावर घेवू नये,पोलिसांनी तात्काळ अनिल बोंडे यांना अटक करावी अशी मागणी काँग्रेसकडून अमरावती येथे करण्यात आली आहे

Jan 18, 2022  |  06:03 PM (IST)
Thane Agitation : ठाण्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांना निवेदन 

कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर भाजपकडून ठाण्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांना निवेदन 

काल कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्यानंतर आज ठाण्यातील भाजप कडून याच वक्तव्याचा तीव्र निषेध करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याचं पार्श्वभूमीवर ठाण्यातील कापुरबावडी आणि नौपाडा पोलीस ठाण्यात नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा निवेदन देण्यात आहे.

Jan 18, 2022  |  05:57 PM (IST)
MLA Pratab Adsar : नाना पाटोलेवर पक्षांतर्गत कारवाई व्हायलाच हवी.. आ. प्रताप अडसड

अमरावती : भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात एका सभेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो असं वक्तव्य केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना ही भाषा सोबत नाही काँग्रेस पक्षाने पक्षांतर्गत कारवाई नाना पटोले यांवर करणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी दिली आहे.

Jan 18, 2022  |  05:55 PM (IST)
Bavankule file compliant :   नाना पटोले यांच्याविरूद्ध बावनकुळे यांची पोलिसांत तक्रार
नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री कूही पोलीस ठाण्यात दाखल केली.  देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांना अशी गंभीर धमकी देणारे नाना पटोले यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून बावनकुळे आणि इतर भाजपा नेत्यांनी पोलिसांना केली.  यावेळी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा नेते आनंदराव राऊत, अजय बोढारे आणि पदाधिकारी- कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
Jan 18, 2022  |  05:48 PM (IST)
Anil Bonde : नाना पटोलेंवर टीका करताना अनिल बोंडेची जीभ घसरली
अमरावती : सोनियांना गांधी यांना खूश करण्यासाठी मोदीवर किती भुंकायचे याची शर्यत काँग्रेस मध्ये लागली आहे,नाना ने तर हद्दच केली मी मालकीनचा सगळ्यात प्रमानिक कुत्रा आहे म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली  असे वक्तव्य भाजपचे माजी कृषि मंत्री अनिल बोंडे यानी केले,पण नानांनी लक्षात ठेवाव शाहिस्ते खानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोर निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव..असेही त्यानी यावेळी सांगितले
Jan 18, 2022  |  05:34 PM (IST)
Jalana Agitation : नाना पटोले यांच्याविरोधात जालना जिल्हा भाजपच्यावतीने शहरातील गांधी चमन चौकात निषेध आंदोलन

जालना :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आज जालना जिल्हा भाजपच्या वतीने शहरातील गांधी चमन चौकात आंदोलन करून निषेध करण्यात आला. आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परीसर दणाणून सोडला. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यानी नाना पटोले यांच्या पोस्टरवरील फोटोला जोडे मारून त्यांचा पुतळा जाळला. पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला त्याचप्रमाणे नाना पटोले यांच्यावर देखील गुन्हा दाखल, करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 

Jan 18, 2022  |  05:35 PM (IST)
Nanded BJP on Nana Patole : नाना पटोलेंवर टीका करताना भाजप महानगर अध्यक्ष्यांची जीभ घसरली

नांदेड :  नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला व गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे नाना पटोले मध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसच्या जीवावरती नांदेडमध्ये येऊन दाखवावे भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना चप्पलाचा हार घालण्यात येईल, अशा इशारा भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष प्रविन साले यांनी दिला आहे. दरम्यान त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे रीतसर पोलिसांमध्ये तक्रारदेखील केली आहे.

Jan 18, 2022  |  05:36 PM (IST)
Kalyan BJP Want Arrest of Nana Patole : कल्याणात नाना पाटोले यांच्या विरोधात निदर्शने

भाजप महिला कार्यकर्त्यानी नाना पाटोले फोटोला जोडे मारत व्यक्त केला निषेध नाना पाटोले यांना अटक करण्याची हिम्मत आघाडी सरकारमध्ये आहे का ? त्यांना अटक झाली पाहिजे - भाजपची मागणी 

काँग्रेस प्रदेश  अध्यक्ष नाना पाटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं . त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा नाना पाटोले यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे कल्याणमध्ये भाजपच्या वतीने नाना पाटोले  यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला . यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेतील काटेमानिवली चौकात जोरदार घोषणाबाजी करत नाना पाटोले यांच्या फोटोला जोडे मारत पाटोले यांचा निषेध करण्यात आला . यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पाटोले यानी बेताल वक्तव्य केलंय . महा विकास आघाडी सरकारमध्ये मंत्री पद मिळवण्यासाठी अशी बेताल  वक्तव्य करत असतात  .केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर ठाकरे सरकारने कारवाई केली आता नाना पाटोले यांना अटक करण्याची हिम्मत आघाडी सरकारमध्ये आहे का ?असा सवाल करत  त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी केली 

Jan 18, 2022  |  05:37 PM (IST)
Pandharpur :  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

पंढरपूर -  भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी
पटोले यांच्यावर जो पर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही. तो पर्यंत पोलीस स्टेशन मधील  ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा पवित्रा 

Jan 18, 2022  |  05:38 PM (IST)
Khamgaon : नाना पटोलेच्या वक्तव्याच्या निषेधार्थ खामगावात पटोलेंचा यांचा पुतळा जाळला

 बुलढाणा - खामगाव :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत एकेरी शब्दांचा उल्लेख करीत त्यांना मारण्याची भाषा वापरणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच खामगांव शहर  पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. यावेळी सर्व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Jan 18, 2022  |  04:15 PM (IST)
वर्धा - नाना पटोले यांच्या विरोधात पोलिस स्टेशन समोर भाजपाचे ठिय्या आंदोलन

वर्धा :  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद वर्धा जिल्ह्यातही उमटत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी शहर पोलिस स्टेशन  येथे निवेदन देऊन केली..

 मात्र, नाना पटोले यांच्या विरोधात वर्धा शहर पोलिस स्टेशन यांनी एफ आय आर दाखल न केल्याने चक्क भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन समोरच ठिय्या आंदोलन केले आणि जोपर्यत एफ आय आर दाखल करणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहिले असेही भाजपा कार्यकत्यांनी सांगितले.