विधान परिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. त्यांनी शिवसेनेविरोधात उघडपणे बंड पुकारले आहे. शिंदे यांनी त्यांच्याकडे ४५ आमदार असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेने शिंदे यांच्या ऐवजी विधानसभेसाठी नव्या गटनेत्याची निवड केली आहे. ही निवड बेकायदा आहे कारण पक्षातील बहुसंख्य आमदार आपल्यासोबत आहेत, असे शिंदे यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे.