LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Board HSC Result 2022 Declared Live Updates: निकाल ऑनलाइन पाहिला आता ऑफलाइन मार्कशीट मिळणार या दिवशी, पाहा तपशील

Maharashtra Board HSC 12th Result 2022 LIVE : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, MSBSHSE च्या HSC निकाल 2022 आज लागला झाला. यात महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची टक्केवारी ९४.२२ टक्के इतकी राहिली. बारावीचा निकाल mahresult.nic.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org आणि इतर वेबसाइटवर उपलब्ध होईल. HSC निकाल 2022 ची तारीख आणि वेळ, तपासण्यासाठी वेबसाइट्सची यादी, टॉपर्स, उत्तीर्ण निकष, उत्तीर्णतेची टक्केवारी आणि बरेच काही यावर नवीनतम आणि थेट

 MSBSHSE HSC Result 2022 LIVE
फोटो सौजन्य:  BCCL
बारावीच्या निकालाची तारीख ठरली | फोटो सौजन्य: Times of India

MSBSHSE HSC Result 2022 LIVE: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा 12वीचा निकाल आज जाहीर झाला. संपूर्ण निकाल विद्यार्थी दुपारी 1 वाजता mahresult.nic.in सह अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकणार आहेत. 12वी ची परीक्षा यंदा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान घेण्यात आली होती. यंदा 15 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे.

Jun 08, 2022  |  05:09 PM (IST)
HSC result 2022 live : तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयात बारावीची गुणपत्रिका मिळणार

HSC result live: ऑनलाइन निकाल पाहून झाला असेल तर आता ऑफलाइन मार्कशीटसंदर्भात महत्त्वाची माहिती. बारावीची गुणपत्रिका 17 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता तुम्हाला तुमच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये मिळणार आहे.

Jun 08, 2022  |  03:56 PM (IST)
HSC Topper list 2022 : कोण आले बारावी परीक्षेत टॉपर

बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींनी जास्त मार्क मिळवलेत.

महाराष्ट्र बोर्डाकडून गेल्या काही वर्षांपासून टॉपर्स लिस्ट देणं बंद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांमधील स्पर्धेला अटीतटीचं स्वरुप येऊ नये, यासाठी बोर्डाकडून टॉपर्स विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे बंद करण्यात आलं होते.

मात्र विभागीय निकालात कोण पुढे आणि कोण मागे, याची आकडेवारी जारी करण्यात आली आहे.

Jun 08, 2022  |  03:49 PM (IST)
HSC result 2022: शिक्षक,पालक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन!- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
HSC result live: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व विद्यार्थी आणि पालकांचं अभिनंदन केलंय. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ज्या प्रकारे संयम बाळगून आणि मोठ्या कष्टाने कोरोना आणि बारावीची परीक्षा दोन्हीशी लढाई केली आहे त्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी शाबासकी दिली आहे.
Jun 08, 2022  |  03:21 PM (IST)
बारावीच्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संदेश
HSC result live: बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
Jun 08, 2022  |  03:13 PM (IST)
HSC result live : बारावीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांना दिला संदेश

Maharashtra HSC Result 2022:बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री संदेशात म्हणतात,

आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल. त्यासाठीही शुभेच्छा.

Jun 08, 2022  |  02:00 PM (IST)
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 डायरेक्ट लिंक झाली Active

महाराष्ट्र बोर्डचे निकाल जाहीर झाले आहेत.  डायरेक्ट लिंक Active झाली आहे, विद्यार्थी या लिंकवर निकाल पाहा 
https://testservices.nic.in/result/mbhsc2022/mbhsc2022.htm

Jun 08, 2022  |  01:35 PM (IST)
HSC चे निकाल 2022 घोषित, mahresult.nic.in ची सक्रिय लिंक तपासण्यासाठी क्लिक करा

HSC Results 2022 declared link to check mahresultnicin active

Jun 08, 2022  |  01:20 PM (IST)
Maharashtra HSC Result 2022: ओरीजीनल मार्कशीट कधी मिळणार?

HSC result live निकाल लागल्यानंतर 17 जून रोजी विद्यार्थ्यांना मार्कशीट (गुणपत्रिका) वितरीत केल्या जाणार आहेत. शिक्षण मंडळाचे प्रभागीय सचिव माणिक बांगर यांनी ही माहिती दिली आहे.

Jun 08, 2022  |  01:29 PM (IST)
HSC result live : राज्यात 158 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला

HSC result live : राज्यात 158 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला

बारावीच्या  सर्व विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर. निकाल लाईव्ह पाहण्यासाठी इथे क्लिक करा. निकाल पाहण्यासाठी हवा फक्त तुमचा रोल नंबर किंवा आईचं नाव...

HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in  बारावीचा निकाल लागला. लगेच निकाल आणि मार्कशीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Jun 08, 2022  |  01:14 PM (IST)
HSC Result MSBSHSE Declared 2022 online check : रिचेकिंगसाठी ही माहिती महत्त्वाची

बारावीचा निकाल आज जाहीर झाल्यावर जर तुम्हाला अपेक्षेप्रमाणे मार्क मिळालेलं नसतील तर रिचेकिंग म्हणजेच गुणांची फेर पडताळणी करायचा पर्याय वापरता येईल. यासाठी निकालांनंतर  गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत. रिचेकिंग प्रक्रिया 10  जून ते 20  जून या कालावधीत होणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 जून ते 29 जून पर्यंत अर्ज करता येईल. रिपीट एक्साम म्हणजेच पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणे जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यासाठी 10 जूनपासून अर्ज सुरू होतील. तर विद्यार्थ्यांना मार्क्सशीट त्यांच्या कॉलेजमध्ये 17 जून दिवशी दुपारी  3वाजता वितरित केली जाणार आहे.

Jun 08, 2022  |  01:10 PM (IST)
HSC Result MSBSHSE Declared 2022 online check : पाहा मार्कशीट सर्वात अगोदर

पुढील वेबसाइट्सवर पाहता येईल निकाल -

1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in

Jun 08, 2022  |  12:59 PM (IST)
MSBSHSE HSC Result 2022 Declared check Offline: १२वीचा निकाल पाहा एका SMSवर, जाणून घ्या कसा
  1. स्टेप १ - मोबाइलवरील SMS ऍप्लिकेशनवर जा.   MHHSC टाईप करुन तुमचा सीट नंबर टाईप करा. 
  2. स्टेप २ -   महाराष्ट्र SSC निकाल 2022 साठी प्रकार - MHSSCआसन क्रमांक. आणि msbshse निकालासाठी 2022 टाइप करा - MHHSCआसन क्रमांक.
  3. स्टेप ३ - या नंतर हा एसएमएस तुम्ही 57766 या क्रमांकावर पाठवा.
  4.  स्टेप ४ - हा एसएमएस पाठविल्यानंतर अवघ्या काही क्षणातच तुम्हाला बोर्डाकडून एसएमएस येईल आणि त्यामध्ये तुम्ही निकाल पाहू शकता. 
Jun 08, 2022  |  12:55 PM (IST)
Maharashtra HSC Result 2022 live : नापास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट

HSC result live : नापास झालेल्या 5.78 टक्के विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी  त्यांना पुरवणीपरीक्षेच्या माध्यमातून पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे.

Jun 08, 2022  |  12:54 PM (IST)
HSC result 2022 Live :बारावीच्या निकालाची मार्कशीट पाहा काही क्षणात

बरोबर एक वाजता निकाल लाईव्ह आणि पाहता येणार निकाल 

Jun 08, 2022  |  12:38 PM (IST)
HSC Result 2022 declared live : विद्यार्थिनींची बाजी

 सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९५.३५ असून विद्यार्थ्यांचा निकाल ९३.२९ आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यापेक्षा २.०६% ने जास्त आहे.

Jun 08, 2022  |  12:38 PM (IST)
HSC Result 2022 declared live : कोकण मंडळाची बाजी, मुंबई सर्वात मागे

 सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.२१%) सर्वाधिक तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९०.९१%) आहे.

Jun 08, 2022  |  12:37 PM (IST)
HSC Result 2022 declared : पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची निकालाची टक्केवारी ५३.०२ टक्के

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ३५५२७ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १८७५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ५३.०२ आहे.

Jun 08, 2022  |  12:36 PM (IST)
HSC Result 2022 declared live : निकालाची टक्केवारी

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण १४,४९,६६४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३९,७३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,५६,६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि निकालाची टक्केवारी ९४.२२ आहे.

Jun 08, 2022  |  12:35 PM (IST)
HSC Result 2022 declared live : असा तपासा निकाल

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर जा.
येथे होमपेजवर निकाल पेजवर क्लिक करा.
एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा.
लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर भरा आणि सबमिट करा.
बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
 

Jun 08, 2022  |  11:49 AM (IST)
MSBSHSE HSC Result 2022 check Offline: १२वीचा निकाल पाहा एका SMSवर, जाणून घ्या कसा
  1. स्टेप १ - मोबाइलवरील SMS ऍप्लिकेशनवर जा.   MHHSC टाईप करुन तुमचा सीट नंबर टाईप करा. 
  2. स्टेप २ -   महाराष्ट्र SSC निकाल 2022 साठी प्रकार - MHSSCआसन क्रमांक. आणि msbshse निकालासाठी 2022 टाइप करा - MHHSCआसन क्रमांक.
  3. स्टेप ३ - या नंतर हा एसएमएस तुम्ही 57766 या क्रमांकावर पाठवा.
  4.  स्टेप ४ - हा एसएमएस पाठविल्यानंतर अवघ्या काही क्षणातच तुम्हाला बोर्डाकडून एसएमएस येईल आणि त्यामध्ये तुम्ही निकाल पाहू शकता.