एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड. विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी दोन तृतियांश आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी झाल्याचे वृत्त. एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेच्या ३७ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड. विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी दोन तृतियांश आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी झाल्याचे वृत्त. एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेच्या ३७ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा.
एकनाथ शिंदे काल रात्री अचानक गुजरातला जाऊन परतले?
गुवाहाटीहून अचानक गुजरातला जाऊन परतले.
खासगी गाडीने गुवाहाटी विमानतळावर जाऊन ते स्पेशन विमानाने गुजरातला जाऊन पुन्हा पहाटे परतले.
शिंदे साहेबांमुळे आम्ही शांत आहोत. आमदारांना धमकविण्याचे काम सुरू आहेत. हा महाराष्ट्र आहे, मोघलाई नाही
रॅलीबाबत मला माहिती नाही, सोशल मीडियावरील मेसेजवर विश्वास ठेवून सर्व जण येथे जमले आहेत - श्रीकांत शिंदे
एकनाथ शिंदेच्या मंत्रालयातून सर्वांना निधी मिेळत होता - श्रीकांत शिंदे
खरे शिवसैनिक असाल तर समोर या, लांबून दगड मारण्याचे काम करू नका
शिवसैनिकांची माथी भडकविण्याचे प्रकार होत आहे.
सर्वांच्या घरावर आणि कार्यालयावर हल्ले होत आहे.
आम्हांला निधी मिळत नाही ही आमदारांची तक्रार
आमदार आणि मंत्री निघून गेले यात काही तथ्य होते.
अडीच वर्षात पक्ष वाढलेला नाही, खाली गेला आहे. - श्रीकांत शिंदे
कार्यकर्त्यांचा जीव आघाडीत घुसमटतोय - श्रीकांत शिंदे
शिव संपर्क अभियानात शिवसैनिकांची स्थिती लक्षात आली.
इतिहासात इतका असंतोष झाला नाही, तो सत्ता असताना अडीच वर्षात झाला.
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यात शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा
एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात शक्ती प्रदर्शन
अडीच वर्षाच्या आघाडीतून बाहेर पडले पाहिजे
एका वेळी ५० लोकाना त्रास होतोय, याचा विचार केला पाहिजे.
मुख्यमंत्र्यामुळे शिवसैनिकांना चांगले दिवस येतील असे वाटले होते. पण कार्यकत्यांना आजही चांगले दिवस येतील.
माझ्या गावातील रस्ता होईल, असे वाटले होते पण तसे काही झाले नाही - श्रीकांत शिंदे
कार्यकर्त्याची कुठलेही कामे होत नाही - श्रीकांत शिंदे
सामान्यांना न्याय देऊन फायदा होत नसेल, तर अशी सत्ता येऊन काय फायदा - श्रीकांत शिंदे
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने उद्धव ठाकरेंवर विश्वास दाखवला
बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले
शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे ही नावं इतर कोणीही वापरू शकत नाही असा ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने केला
कोणत्याही बंडखोरावर शिवसेनेने कारवाई केलेली नाही
शिवसेना संपविण्याचा भाजपचा डाव - उद्धव ठाकरे
दादागिरी खपवून घेणार नाही, रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत शिवसैनिकांना दिला इशारा
राष्ट्रीय कार्यकारिणीने मंजूर केलेले प्रस्ताव शिवसेना निवडणूक आयोगाला कळवणार
मुंबईत १० जुलै पर्यंत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू
उस्मानावाद येथे शिवसेनेत 2 गट पडले आहेत. शिवसैनिकांनी आमदार सावंत यांच्या संपर्क कार्यालयावर हल्लाबोल करीत काळे फसल्यानंतर सावंत समर्थकांचा गट आक्रमक झाला. शिवसैनिकांच्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून सावंत समर्थकांनी सावंत यांच्या उस्मानाबाद संपर्क कार्यालयाचे शुद्धीकरण करीत खेकडा सावंत गद्दार असे काळे लिहिलेले खोडून काढले आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पाच प्रस्तावांना मान्यता, शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे, शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे ही दोन्ही नावं इतर कोणालाही वापरता येणार नाही
ठाणे आणि मुंबईत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी
शिवसेनेच्या विधानसभेतील १६ बंडखोर आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झीरवळ यांनी पाठवली कारणे दाखवा नोटीस, सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले; समाधानकारक उत्तर दिले नाही तर निलंबन केले जाणार । सुनिल प्रभु यांनी व्हिप बजावला होता. त्यानंतर या आमदारांनी बैठकीला अनुपस्थिती होती. त्यामुळे सोळा आमदारांची निलंबन होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, बैठकीत महत्त्वाचे निर्णय होणार; निर्णयांची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाणार
रामदास कदम, अनंत गिते, आनंदराव अडसूळ शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित