LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra SSC Result 2022 Live : चला निकाल पाहू या, सर्वात आधी निकाल पाहण्यासाठी टीप्स आणि ट्रिक्स

Maharashtra SSC 10th Board Result 2022 check www.mahresult.nic.in, SSCresult.mkcl.org, mahahsscboard.in LIVE:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत (इ.१० वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून २०२२ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होईल.

Maharashtra SSC Result 2022
फोटो सौजन्य:  Representative Image
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल

Maharashtra SSC Result 2022 Live :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत (इ.१० वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून २०२२ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होईल.

दहावीच्या मार्च-एप्रिल २०२२च्या परीक्षेला १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलगे असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे.

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

निकाल बघण्यासाठी....

1. http://mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org 
3. https://ssc.mahresults.org.in 

Jun 17, 2022  |  07:38 PM (IST)
Maharashtra Board 10th Result Live: इतक्या विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त टक्के गुण

82 हजार 60 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त टक्के गुण

Jun 17, 2022  |  03:27 PM (IST)
मार्कशीटमध्ये खालील गोष्टी नीट चेक करून घ्या

1. नाव

2. शाळा आणि परीक्षा केंद्र

3. एकूण गुण

4. ग्रेड्स

5. टक्केवारी

6. पास नापास काय लिहिलंय ते चेक करा

Jun 17, 2022  |  03:27 PM (IST)
नाशिकचा निकाल सगळ्यात कमी

यावर्षी नाशिकचा निकाल सगळ्यात कमी, नाशिकचा निकाल 95 टक्के 

Jun 17, 2022  |  01:36 PM (IST)
दहावीत पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्रिवार अभिनंदन

दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचं हार्दिक अभिनंदन..

अजूनही निकाल पाहिला नसेल, तर निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा :

निकाल बघण्यासाठी....

1. http://mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org 
3. https://ssc.mahresults.org.in 

Jun 17, 2022  |  01:04 PM (IST)
निकालाची लिंक ओपन

दहावीच्या निकालाची लिंक ओपन झाली आहे. 

Jun 17, 2022  |  12:58 PM (IST)
पुढच्या तीन मिनिटात वेबसाइट होणार ओपन

ऑनलाईन निकाल लागण्यास अवघी दहा मिनिटं बाकी

 

थोड्याच वेळात लागणार दहावीचा निकाल

ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार निकाल

निकालाला उरली अवघी तीन मिनिटं..

Jun 17, 2022  |  12:55 PM (IST)
महाराष्ट्र बोर्डाचा एसएससी निकाल कसा तपासणार?

स्टेप 1-दहावीचा निकाल पाहण्यासाठी प्रथम या वेबसाईटवर क्लिक करा; mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या वर क्लिक करा

स्टेप 2- वेबसाईटच्या होम पेजवर Maharashtra SSC Result 2022 वर तुम्हाला निकाल पाहण्याची लिंक पाहायला मिळेल, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा

स्टेप 3- क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख आणि विद्यार्थ्याचा आसन क्रमांक त्यामध्ये टाकावा लागणार आहे

स्टेप 4- तुम्ही आसन क्रमांक प्रविष्ठ केल्यानंतर तुम्हाला दहावी निकाल 2022 तुम्ही पाहू शकणार आहात.

स्टेप 5- त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रत्येक विषयानुसार तुम्ही निकाल पाहू शकणार आहात.

स्टेप 6- त्या साईटवर तुम्ही निकाल पाहिल्यानंतर तुम्ही तुम्ही तो डाऊनलोडही करु शकणार आहात. त्याची प्रिंटही तुम्हाला त्याच साईटवरुन मिळणार आहे.

Jun 17, 2022  |  12:33 PM (IST)
maharashtra SSC result 2022 live : या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण

शासन निर्णय दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ नुसार विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेतील सहभागासाठी सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात आलेले आहेत. तथापि, कोविड १९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय रेखाकला (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट (ड्रॉईंग ग्रेड) सवलतीच्या गुणाबाबत शासन निर्णय दि. २१/०२/२०२२ नुसार कार्यवाही करून सवलतीचे गुण प्रदान करण्यात आलेले आहे.

Jun 17, 2022  |  12:31 PM (IST)
Maharashtra Board SSC 10th Result 2022 Live Updates:  श्रेणीसुधार / गुणसुधार योजना

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्याना त्यांची संपादणूक यासाठी श्रेणी/ गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत फक्त लगतच्या दोनच परीक्षांमध्ये पुनःश्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. मार्च-एप्रिल २०२२ च्या परीक्षेस प्रथमच नियमित विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व घेवून प्रविष्ट होणाऱ्या) जुलै-ऑगस्ट २०२२ व मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस 'श्रेणी सुधार' साठी प्रविष्ट होण्यास दोन संधी देण्यात येत आहेत.

Jun 17, 2022  |  12:30 PM (IST)
maharashtra SSC result 2022: सर्वोत्तम पाच (बेस्ट फाईव्ह) निकष

सर्व सहा अनिवार्य विषयांसह प्रविष्ट होवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सहा अनिवार्य विषयांचे विषयनिहाय गुण दर्शवून त्यापैकी ज्या पाच विषयांची टकेचारी अधिक असेल त्या पाच विषयांचे एकूणात गुण (५०० पैकी) व टवेवारी गुणपत्रिकेत दर्शविण्यात आलेली आहे. मात्र उत्तीर्णतेचे निकष व अन्य सवलती प्रचलित पध्दतीप्रमाणे ठेवण्यात आलेल्या आहेत.

Jun 17, 2022  |  12:30 PM (IST)
maharashtra SSC result 2022 live : 'एटीकेटी' सुविधा

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस नोंदणी केलेल्या एक वा दोन विषयांत उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीप्रमाणे एटीकेटी ची सुविधा लागू राहील.

Jun 17, 2022  |  12:00 PM (IST)
Maharashtra Board SSC 10th Result 2022 Live Updates: इतक्या शाळांचा निकाल १०० टक्के

राज्यातील २२,९२१ माध्यमिक शाळांतून १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२,२१० शाळांचा निकाल १००% लागला आहे.

Jun 17, 2022  |  11:56 AM (IST)
maharashtra SSC result 2022 live : कोणाला मिळाला फर्स्ट क्लास तर कोणाला मिळाला पास क्लास

राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६,५०,७७९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५,७०,०२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २,५८,०२७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत. ४२, १७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

Jun 17, 2022  |  11:51 AM (IST)
maharashtra SSC result 2022: २४ विषयांचा निकाल १००%

एकूण २४ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.
 

Jun 17, 2022  |  11:50 AM (IST)
Maharashtra Board 10th Result Live: दिव्यांगात ९४.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८,१६९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,०२९ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ७,५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४० आहे.

Jun 17, 2022  |  11:47 AM (IST)
१.९० टक्के जास्त मुली उत्तीर्ण

सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० ने जास्त आहे.

Jun 17, 2022  |  11:45 AM (IST)
मुलीनी मारली बाजी

सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलपिक्षा १.९० ने जास्त आहे. • या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८,१६९ दिव्यांग विद्याथ्र्यां

Jun 17, 2022  |  11:44 AM (IST)
पुनर्परिक्षार्थी ४१,३९० विद्यार्थी उत्तीर्ण

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ५४,१५९ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२,३५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ४१,३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीपतिची टक्केवारी ७९.०६ आहे.

Jun 17, 2022  |  11:42 AM (IST)
१५,८४,७९० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,८४,७९० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,६८,९७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,२१,००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ आहे.

Jun 17, 2022  |  11:29 AM (IST)
गेल्या तीन वर्षाची निकालाची तुलना
गेल्या तीन वर्षाची निकालाची तुलना
गेल्या तीन वर्षाची निकालाची तुलना