LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Maharashtra Rain LIVE Updates: पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता

Mumbai Maharashtra Monsoon Weather update : मुंबई, रायगड, कोल्हापूरसह कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, तर दक्षिण कोकण, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी
फोटो सौजन्य:  BCCL
मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, तर दक्षिण कोकण, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी

Mumbai Maharashtra Monsoon Weather update : मुंबई, रायगड, कोल्हापूरसह कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे.  पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Jul 06, 2022  |  11:38 PM (IST)
चुनाभट्टीमध्ये दरड कोसळल्याने तीन जण जखमी

मुंबई : चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरातील घरांवर दरड कोसळल्याने तीन जण जखमी झाले आहेत.शिवम प्रकाश सोनवणे(१७) प्रकाश जगन्नाथ सोनवणे(४२), सुरेखा वीरकर(२८) अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, चुना भट्टी पोलीस आणि पालिका एल विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Jul 06, 2022  |  03:52 PM (IST)
MUMBAI | संततधार होणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे देखील सज्ज - शिवाजी सुतार, मध्यरेल्वे अधिकारी

 मुंबई परिसरात हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे देखील सज्ज झाले असून मध्य रेल्वेने निवडलेल्या स्पॉटवर पाणी साचू नये याकरिता उपाययोजना देखील केले आहे मागील वर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात उपायोजना करण्यात आला असून अनेक ठिकाणी रेल्वे रुळावरून पाणी काढण्याकरिता मोठे हेड पंप देखील लावण्यात आले आहे. मुंबईतील रेल्वे कडून कशाप्रकारे तयारी करण्यात आली आहे.  या संदर्भातील माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

Jul 06, 2022  |  03:32 PM (IST)
पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मान्सून सर्वाधिक राहण्याची शक्यता

येत्या ४, ५ दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता.

या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता 

विदर्भ, मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता.

Jul 06, 2022  |  02:17 PM (IST)
पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया परिसरात पर्यटकांची गर्दी
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक घराबाहेर पडल्याचं दिसून येत आहे.
Jul 06, 2022  |  02:04 PM (IST)
पावसाची स्थिती, उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर पोहचल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात
Jul 06, 2022  |  01:27 PM (IST)
किल्ले रायगडावर तुफान पाऊस
किल्ले रायगडच्या महादरवाजाच्या खालच्या बाजुस बुरुज आणि पायऱ्यांवरून खळाळणाऱ्या पाण्याचा व्हिडीओ व्हायरल
Jul 06, 2022  |  12:00 PM (IST)
मुंबईत पावसाचा जोर वाढला, मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचलं
Jul 06, 2022  |  11:54 AM (IST)
जोरदार पावसामुळे दादरमधील रस्त्यांवर पाणीच पाणी
Jul 06, 2022  |  11:14 AM (IST)
मुंबईकरांनो सावधान! समुद्रात दुपारी मोठी भरती, 3.27 मीटर उंचीच्या लाटा उसळणार

मुंबईत आज दिवसभर पाऊस सुरूच राहिल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आज दुपारी 4 वाजून 49 मिनिटांनी 3.27 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.  नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, असंही हवामान विभागानं सांगितले आहे.
 

Jul 06, 2022  |  11:12 AM (IST)
JALGAON : पाचोरा शहरात पावसाची दमदार हजेरी
रात्रीच्या वेळी पाचोरा शहरासह ग्रामीण भागात गेले काही दिवस पावसाने उसंत घेतली होती. मात्र दोन दिवस पाचोरा शहरातील आणि आजू बाजूच्या परिसरात जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे पाचोरा शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
Jul 06, 2022  |  10:16 AM (IST)
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग, मुसळधार पावसामुळे माटुंगा येथील रस्त्यांवर पाणी साचलं
Jul 06, 2022  |  09:43 AM (IST)
Kolhapur Rain Update : कोल्हापूरला महापुराची पुन्हा धास्ती, काही तासांतच धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता

यंदाही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची नागरिकांनी धास्ती घेतली आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेला मंगळवारी पूर आला. पंचगंगेचे पाणी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पात्राबाहेर पडले.  पंचगंगेच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांत दहा फुटांनी वाढ झाली. सोमवारी सकाळी पंचगंगेची पातळी 15 फुटांवर होती. मंगळवारी सकाळी ती 24.5 फुटांपर्यंत गेली. दरम्यान आज (दि.06) नंतर सकाळी 9 पर्यंत 31 फुटांवर पोहोचली आहे. दर दोन तासाला सरासरी अर्धा फुटाने पाणी वाढत चालले आहे.  

Jul 06, 2022  |  09:39 AM (IST)
रत्नागिरी - देवस्थानाला अतिवृष्टीचा फटका
गेल्या दोन ते तीन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत असताना रत्नागिरीतील काजळी नदीच्या पुराचा फटका मठ येथील देवस्थानाला बसला असून हे देवस्थान गेले तीन दिवस पाण्यात आहे. लांजा मठ येथील मंदिर हे स्वयंभु दत्तमंदिर असून ते भाविकांचे श्रद्धास्थान आहे सध्यस्तिथीत अर्धा मंदीराचा भाग हा पाण्यात बुडालेला आहे. पाऊस जर असाच पडत राहिला तर मंदिराच्या कळसापर्यंत हे पाणी पोहचेल असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
Jul 05, 2022  |  11:35 PM (IST)
कराडमध्ये कारवर झाड कोसळले

सातारा : सातारा जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. मंगळवारी दुपारी कराड शहरातील गुजर हाॅस्पिटलनजीक एक झाड रस्त्यावर कारवर कोसळले. यात कारचे आणि हाॅस्पिटलच्या सरंक्षक भिंतीचे मोठे नुकसान झाले. परंतू कारमधील चालक व सहप्रवाशांना कोणतिही इजा झाली. 

Jul 05, 2022  |  08:15 PM (IST)
येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढेल - हवामान तज्ज्ञ डॉ रामचंद्र साबळे
येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढेल - हवामान तज्ज्ञ डॉ रामचंद्र साबळे
Jul 05, 2022  |  08:06 PM (IST)
RAIGAD | भाजप नेते प्रविण दरेकर यांनी महाड-पोलादपूर येथे पूर परिस्थितीची केली पाहणी
Jul 05, 2022  |  07:54 PM (IST)
नवी मुंबई: विमानतळाच्या भरावाच्या कामामुळे गावात शिरलं पाणी
Jul 05, 2022  |  07:41 PM (IST)
मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव ओसंडून वाहू लागला.
Jul 05, 2022  |  09:05 PM (IST)
जळगावात मुसळधार पावसामुळे पडले झाड
जळगाव शहरात सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्याचा वेग वाढल्याने शहरातील सर्वाधिक वर्दळ व वाहतूक असलेल्या स्टेशनरोडवर झाड कोसळून एकेरी मार्गाची वाहतूक ठप्प झाली.
Jul 05, 2022  |  07:18 PM (IST)
Maharashtra Rain LIVE updates: राज्यात मुसळधार पाऊस; NDRF च्या 9, SDRF च्या 13 तुकड्या विविध जिल्ह्यांत तैनात

महाराष्ट्रातील पूर परिस्थितीबाबत सीएमओची पूर्वतयारी

पूरस्थितीला प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दल (SDRF) च्या 11 तुकड्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

बेस स्टेशनवर 9 NDRF आणि 4 SDRF च्या एकूण 13 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात संपूर्ण कोकणासह अमरावती विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात सरासरी 100 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांत मुंबईत कुलाबा येथे 117 मिमी आणि सांताक्रूझ येथे 124 मिमी पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पूरस्थिती नसून जिल्ह्यातील दोन नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे.