राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 93 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी आज सरासरी 81 तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज महाराष्ट्रातील 106 नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितींसाठी मतदान काल पार पडलं. ओबीसी राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) रद्द झाल्यानं राज्यातील राजकीय पक्ष आक्रमक झाले होते. दरम्यान आज महाराष्ट्रातील 106 नगरपंचायत (Nagar Panchayat Election Result), भंडारा आणि गोंदियातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, यासह सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक आणि शिरोळ, नागभीड , जत , सिल्लोड , फुलंब्री , वानाडोंगरी आणि ढाणकी या नगरपरिषदांमधील रिक्त जागा यासह ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. आज निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.
नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल 2022
* कोणाच्या ताब्यात किती नगरपंचायती ? (आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार)
* एकूण नगरपंचायती-106
* निकाल स्पष्ट झालेल्या नगरपंचायती- 97
* निकाल बाकी असलेल्या नगरपंचायती- 9
* एकूण नऊ नगरपंचायतींचे निकाल उद्या लागणार
— ———————————————-
* भाजप- 25
* काँग्रेस- 21
* शिवसेना-17
* राष्ट्रवादी-27
* इतर-7
————————————————–
* महाविकास आघाडी- 64
* भाजप-25
* इतर- 7