Bully Bai App : बुली बाई ऍप प्रकरणी तीन आरोपींना अटक, १८ वर्षाची तरुणी सूत्रधार, आरोपींना बेंगळूरूतून अटक

मुंबई
Updated Jan 05, 2022 | 15:31 IST

Bully Bai  App काही दिवसांपूर्वी बुली ऍपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांची बदनामी करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना बेंगळूरूतून अटक केली आहे. याप्रकरणी आज मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

थोडं पण कामाचं
  • बुली ऍपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांची बदनामी करण्यात आली होती.
  • या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
  • गेल्या तीन दिवसांपासून बुली बाई ऍप प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Bully Bai  App : मुंबई : काही दिवसांपूर्वी बुली ऍपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांची बदनामी करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना बेंगळूरूतून अटक केली आहे. याप्रकरणी आज मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 

पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले की गेल्या तीन दिवसांपासून बुली बाई ऍप प्रकरणाचा तपास सुरू आहे. अजूनही याबाबत तपास सुरू असून आरोपींना कुठलाही फायदा मिळू नये म्हणून काही गोष्टी गोपनीय ठेवण्यात आल्याचे नगराळे यांनी सांगितले. ३१ डिसेंबर २०२१ रोजी हे ऍप लॉन्च झाले होते. या ऍपवर विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो अपलोड करून त्यांची बोली लावण्यात येत होती, तसेच त्यांच्यावर आखेपार्थ टिप्पणी करण्यात येत होती. २ जानेवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अखेर बेंगरुळूतून तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे. या ऍपचे पाच सबस्क्राईबर्स होते. याची मुख्य सुत्रधार श्वेता सिहं ही १८ वर्षाची तरुणी असून दुसरा आरोपी विशाल झा आणि तिसरा आरोपी झारखंडचा आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे नगराळे यांनी सांगितले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी