मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. कृष्णा हेगडे यांचा काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि आता बाळासाहेंबाची शिवसेना राजकीय प्रवास राहिलेला आहे. (A big leader in Mumbai left Thackeray's Shivbandhan)
हेगडेंनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाहीर प्रवेश केला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना सचिव संजय मोरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे देखील उपस्थित होत्या. एकनाथ शिंदे यांच्याकडून हेगडे यांची बाळासाहेबांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
अधिक वाचा : Gadchiroli : सुरजागड लोह खनिज उत्खननास आदिवासांचा विरोध का? | VIDEO ...
कृष्णा हेगडे यांचा मुंबईतील विले पार्ले भागात प्रभाव आहे. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे समर्थक अशी त्यांची ओळख होती. ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, संजय निरुपम यांच्याशी मतभेद झाल्यानं त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. पण तिथे फार काळ ते रमले नाही. दीड वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेची वाट धरली होती. चार महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतर झाल्यानंतर हेगडेंनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या जवळ गेले आहेत. आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीर कृष्णा हेगडे यांच्यावर शिंदेंनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.