दीड महिन्यापूर्वी आम्ही देखील ५० थरांची दहीहंडी फोडली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई
Updated Aug 19, 2022 | 20:27 IST

आम्ही पण दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून मोठी हंडी फोडली. त्यामुळे आज या राज्यात सर्व सामान्यांचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी व भाजप-शिवसेना विचाराचे सरकार आज महाराष्ट्रात स्थापन झाले आहे.

थोडं पण कामाचं
  • आम्ही पण दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून मोठी हंडी फोडली. त्यामुळे आज या राज्यात सर्व सामान्यांचे सरकार स्थापन झाले आहे.
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी व भाजप-शिवसेना विचाराचे सरकार आज महाराष्ट्रात स्थापन झाले आहे.
  • उपमुख्यमंत्री व आम्ही ठरविले की, सर्व सण-उत्सव राज्यात जल्लोषात साजरा व्हायला पाहिजेत

मुंबई : यंदाची दहीहंडी ही ख-या अर्थाने हिंदुत्वांची हंडी आहे. गोविंदा हे आपली परंपरा व संस्कृती जोपासण्याचे काम करीत असतात. आज गोविंदांच्या चेह-यांवर प्रचंड उत्साह जाणवत आहे. कोविडमुळे गेली दोन वर्षे दही हंडी उत्सवावर निर्बंध होते. परंतु उपमुख्यमंत्री व आम्ही ठरविले की, सर्व सण-उत्सव राज्यात जल्लोषात साजरा व्हायला पाहिजेत, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांशी संवाद साधताना सांगितले.

भाजपचे नेते प्रविण दरेकर यांच्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. 

अधिक वाचा : पायांची जळजळ होणे म्हणजे असू शकतात हे आजार

तुम्ही दहीहंडी मधील हंडी फोडत आहात. आम्ही पण दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून मोठी हंडी फोडली. त्यामुळे आज या राज्यात सर्व सामान्यांचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी व भाजप-शिवसेना विचाराचे सरकार आज महाराष्ट्रात स्थापन झाले आहे. त्यामुळे येणारे सर्व सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करुया , आपली संस्कृती व परंपरा पुढे नेऊया व राज्य सर्व सामान्यांचे आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे सरकार आहे. सर्व सामान्यांना न्याय देणारे हे सरकार आहे असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

यापूर्वी, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. प्रत्येकाला वाटतं की हे आलं सरकार आहे. तुम्हांला वाटतं की नाही तुम्ही मुख्यमंत्री झालात. मला तर अजून वाटत नाही की मी मुख्यमंत्री झालो आहे. मी तुमच्यातलाच एक सामान्य कार्यकर्ता असल्यासारखं वाटतं असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपलं होम पीच असलेल्या ठाण्याच्या टेंभी नाका येथील दहीहंडीत जोरादार फटकेबाजी केली. 

अधिक वाचा :  या गोष्टी पोखरताहेत तुमची किडनी

स्वर्गिय आनंद दिघे यांनी ठाण्याच्या टेंभी नाका येथे दहीहंडी उत्सव सुरू केला होता. त्याच टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थित गोविंदांशी संवाद साधला. दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. गोविंदा उत्सवाला प्रो गोविंदा म्हणून खेळाचा दर्जा दिला आहे. तसेच गोविंदांना 5 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी