Aaditya Thackeray PC: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्दयांवर भाष्य केलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या दोन महिन्यात अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर पत्रकार परिषद घेतल्या, गेल्या अनेक दिवसात कुठेही उत्तर न देता कारभार सुरु. मंत्री महिलांना अपशब्द तरी कारवाई नाही. नुसत्या घोषणा केल्या जात आहेत. कायदा सुव्यवस्था रसातळाला.
आदित्य ठाकरे म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार होता. कमी विकसित क्षेत्रात गेला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तो येणार असे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री खोटे बोलले. माहिती अधिकारात एका दिवसात उत्तर आले. आम्ही माहिती अधिकारात माहिती मागितली त्याला एक दीड महिना लागला. तो आपल्याकडे येणार याचा आज पुरावा देणार.
5 सप्टेंबर 2022 चे पत्र अनिल अग्रवालांना एमायडीसीचे महाव्यवस्थापकांचे. त्यात एमोयु करण्यासाठी येण्याची विनंती. सभागृहात पण मुख्यमंत्री बोलले. पत्रात सबसिडी, सुविधांचा उल्लेख. पुढे जाण्यासाठी मी आपणाला मुंबईला तुमच्या सोयीची तारीख निश्चित करण्यासाठी आमंत्रित करतो आहे. मी तुम्हाला भेटण्यासाठी आतुर आहे असा पत्रात उल्लेख असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
हे पण वाचा : कुटुंबासोबत सिनेमा पाहताना तसा सीन आल्यावर कोणत्या राशीची व्यक्ती कशी वागते
आदित्य ठाकरे म्हणाले, 29 /08/2022 रोजी जी दुसरी बैठक झाली, उपमुख्यमंत्र्यांची ती वेदांता याच राज्यात होण्यासाठी होती की गुजरातला देण्यासाठी होती. याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती का? खोट कोण बोलत आहे उपमुख्यमंत्री का उद्योग मंत्री. माझ पुन्हा त्यांना आव्हान देतो चर्चा करण्याची. नुसते आरोप केल्या जातात. परत परत हे का बोलतोय कारण कालच 28 तारखेला तीन वर्ष झाले असते. साडेसहा लाख कोटींची मविआची गुंतवणूक आणली. दावोस मधून गुंतवणूक आणली. आज दु:ख होतंय खोके सरकार आलं आणि शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत. महाराष्ट्रासाठी तुम्ही काम करणार की नाही?
23/05/2022 चा दावोसचा फोटो आहे. अनेक प्रकल्प एमायडीसीत आहेत त्याला मंजुरी नाही. महाराष्ट्राच्या जनतेशी खोके सरकार खोटे का बोलते आहे? माहिती अधिकारात माहिती मिळाली त्याचाच उल्लेख आज केलाय. कुठल्याही राज्यात गुंतवणूक झाली तर आनंद. परंतु महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अखेरच्या क्षणी घालवला. 5 सप्टेंबरचे पत्र हे स्पष्ट करते की एमोयु कधी सही करायचा याचा उल्लेख असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
हे पण वाचा : गुळाचा एक तुकडा बदलेल तुमचं आयुष्य, केवळ करावा लागेल हा उपाय
आदित्य ठाकरे म्हणाले, हे पत्र एमायडीसीला खात्री होती. कॅबिनेट नोट, हाय पॉवर कमिटी नोट सगळच आहे. काय झाले की गुंतवणूक गुजरातला गेली. मी इतकेच विचारतो मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती होती का? 5 सप्टेंबर ला पत्र आहे याला उत्तर दिलेले नाही कंपनी ट्वीटरवर 11 सप्टेंबरला कळवतो. मी आरोप करणार नाही त्यात राजकारण मला करायचे नाही. युवकांना रोजगाराची संधी होती. तो प्रकल्प घालवला गेला ह्याचा 5 सप्टेंबर चे पत्र पुरावा.
मविआ काळात 93% एमोयु सही झालेले हे टाईम्सने प्रकाशित केले. त्याची यादी देतो. सरकार बदलले तर तुम्हीच वातावरण बदलवले. टाटाचे कुठले अधिकारी म्हणाले महाराष्ट्रात गुंतवणूकीची परिस्थिती नाही. त्याचे नाव उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेले नाही. हे सरकार अल्पायुषी. म्हणून उद्योग महाराष्ट्रात येत नाहीएत. गद्दार आमदार मनासारखे वागतात, दडपशाही करतात यात उपमुख्यमंत्री यांचे नाव खराब होते. उद्योगमंत्र्यांचा खात्याशीच संबंध नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
हे पण वाचा : काळ्या मिरीचे हे उपाय करतील तुम्हाला गडगंज श्रीमंत
29/08/2022 च्या उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा विषय काय याची माहिती उपलब्ध नाही. कोविड काळात मविआचे मुख्यमंत्र्यांचे, सरकारचे कौतुक झाले. सध्या असंवैधानिक सरकारची विश्वासार्हता नाहीए. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल पण वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत, महात्मा फुलेंबाबत वादग्रस्त वक्तव्ये होऊन तुम्हाला चीड येत नाही का? आतापर्यंत राज्यपाल महाराष्ट्राची भूमिका नेत होते. आताही पदमुक्त का करत नाही. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचे उद्योग, उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायचे मनसुबे. अजूनही काही बोलत नाही राज्यपालांच्या बाबतीत.
काश्मिरी पंडित आजही असुरक्षित आहेत ही त्यांची भावना. त्यांचा आवाज कुणी ऐकत नाही. राज ठाकरेंच्या बाबतीत मी बोलणार नाही आम्हाला दु:ख झाले. आजोबांचे खाणे पण त्यांनी काढले. केंद्र सरकारकडून राज्याला समज देणारे पत्र आले आहे. कृषीमंत्री, उद्योग मंत्री बेताल वक्तव्ये करतात.
हे पण वाचा : म्हणून लहान मुले रात्रीचे जागतात
मंत्रिमंडळात एकही महिला नाही. सात आठ वेळा एक मंत्री अपशब्द काढतात. मंत्रिमंडळ विस्तार नाही. मी परत परत प्रकल्पावर बोलणार कारण आज विकासाची राज्याला गरज. मी राजकीय बोललो नाही परंतु विकासाचे मुद्दे महत्वाचे, महागाई, सामान्य नागरिकांचे विषय यालाच माझे प्राधान्य असेल असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.