Dharavi Redevelopment : मुंबई : आशिया जिल्ह्यातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीची ओळख पुसणाऱ्या महत्त्वाकांक्षी विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. जगातील तिसर्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती उद्योजक गौतम अदानी हे धारावीचा विकास करणार आहेत. धारावीचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने निविदा काढली होती. अदानी कंपनीने सर्व कंपन्याना बाजूला सारून ही निविदा मिळवलीये. मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने याबाबत घोषणा केलीये.
धारावी विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवासन यांनी दिलेल्या माहितीनुसार धारावी विकास प्रकल्पासाठी तीन निविदा आल्या होत्या. त्यापैकी एक निविदा नमन ग्रुपची होती. परंतु त्यांची निविदा अपात्र ठरवण्यात आली. त्यानंतर अदानी रियल्टी आणि डीएलफ या कंपन्यांची निविदा उघडण्यात आली. अदानी ग्रुप कंपनीने ५ हजार ६९ कोटी रुपयांची बोली लावली होती. तर डीएलएफने २ हजार २५ कोटी रुपयांची बोली लावली होती. यापैकी अदानी रियल्टीची सर्वाधिक बोली असल्याने त्यांना ही निविदा देण्यात आली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.