ब्रेकिंग: उपमुख्यमंत्री बनताच अजित पवारांना सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट?

मुंबई
Updated Nov 25, 2019 | 16:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ajit Pawar: राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवारांनी भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली. शपथविधीनंतर अजित पवारांवर आरोप असलेल्या सिंचन घोटाळ्यातील काही फाईल्स बंद

ajit pawar irrigation scam clean chit acb sinchan ghotala bjp maharashtra government marathi news
उपमुख्यमंत्री बनताच अजित पवारांना मिळालं मोठं गिफ्ट  

थोडं पण कामाचं

  • उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चीट
  • उपमुख्यमंत्री बनताच अजित पवारांना सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवारांनी भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली. शपथविधीनंतर अजित पवारांना अवघ्या दोन दिवसांतच सिंचन घोटाळा प्रकरणातून क्लीन चीट मिळाल्याचं बोललं जात आहे. जवळपास ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातून अजित पवार यांना एसीबीने क्लीन चीट देण्यात आल्याचं बोललं जात आहे. सिंचन घोटाळ्यातील ९ प्रकरणांमध्ये पुराव्याअभावी नस्तीबंद करण्याद आल्या आहेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या ९ फाईल्स बंद करण्यात आल्या आहेत. 

एसीबी प्रमुखांनी टाइम्स नाऊला प्रतिक्रिया देत म्हटलं की, बंद करण्यात आलेली प्रकरणं रुटीन आहेत. काही फौजदारी प्रकरण होती, काही विभागीय होती तर काही चौकशीची होती. ही चौकशीच्या टप्प्यात आहे. कृपया क्लीन चीट अजिबाद नाही. आमच्याकडे ३००० पेक्षा अधिक तक्रारी आहेत. हे आमचं पूर्णपणे व्यावसायिक काम आहे.

बंद केलेल्या फाईल्सचा अजित पवारांचा काहीही संबंध नाही असंही एसीबीने म्हटलं आहे. तसेच भविष्यात या प्रकरणी काही पुरावे मिळाल्यास या फाईल्स पुन्हा उघडण्यात येतील असंही एसीबीने स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाला होता. कोट्यावधी रुपयांच्या या घोटाळ्याची राज्यात जोरदार चर्चा होती. या घोटाळ्याची चौकशी लाचलुचपत विभाग, सक्तवसुली संचालनालय, एसीबीकडून तपास सुरु होता. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असताना सातत्याने सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणावरुन अजित पवारांवर टीका करत होते. मात्र, अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देत शपथविधी घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्यांना सिंचन घोटाळ्यातील काही फाईल्स बंद झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी