ठाकरे सरकारमध्ये अजितदादांना मिळणार 'ही' मोठी जबाबदारी, पाहा VIDEO

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 27, 2019 | 16:45 IST

Ajit Pawar in Aghadi Government: महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन होत असून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. या सरकारमध्ये अजितदादांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ajit pawar uddhav thackeray government dy cm maharashtra vikas aghadi shiv sena ncp marathi news
अजित पवार (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्र विकास आघाडीची राज्यात सत्ता
  • उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
  • २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी होणार शपथविधी
  • ठाकरे सरकारमध्ये अजित पवारांनाही मिळणार मोठी जबाबदारी

मुंबई: राज्यात आता ठाकरे सरकार स्थापन होत आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून २८ डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत. ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे हे पहिला व्यक्ती निवडणुकीच्या मैदानात उतरला आणि निवडणूक जिंकली सुद्धा. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्र्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनाही मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातून नाराज झालेल्या अजित पवारांनी आपल्या काकांची भेट घेतली आणि आता अजितदादांना ठाकरे सरकारमध्ये मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. अजित पवारांना ठाकरे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं वृत्त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर भाजप सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेत त्यांची समजूत काढली. अखेर अजित पवारांनी अवघ्या चार दिवसांत त्यानी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर राज्यातील भाजपचं सरकार कोसळलं.

आता अजित पवारांना पुन्हा एकदा मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला आहे. राज्याच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असणार आहेत. तर काँग्रेस पक्षाचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक असे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे पद अजित पवारांना दिलं जाणार असल्याचं वृत्त आहे तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी