'अमिताभ, अक्षयच्या सिनेमांचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही': काँग्रेस

मुंबई
सुनिल देसले
Updated Feb 18, 2021 | 17:29 IST

Nana Patole said why Amitabh Bachchan, Akshay Kumar are silent on fuel price hike: इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सेलिब्रेटींवर निशाणा साधला आहे.

Amitabh bachchan akshay kumar why quiet on fuel price hike we will not allowed shooting of there pictures in maharashtra said nana patole
'अमिताभ, अक्षयच्या सिनेमांचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही': काँग्रेस 

थोडं पण कामाचं

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या निशाण्यावर बॉलिवूड सेलिब्रेटी
  • इंधन दरवाढीवरुन अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर नाना पटोलेंनी साधला निशाणा
  • यूपीएच्या काळात इंधन दरवाढीवरुन टीव टीव करणारे आता गप्प का? नाना पटोलेंचा सवाल 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात सातत्याने इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीसोबतच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. इंधन दरवाढीच्या मुद्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही 

नाना पटोले यांनी म्हटलं, पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि गॅस सिलिंडरच्या दरात झालेली वाढ यामुळे सामान्य नागरिकांचे जगणं मुश्किल झाले आहे. ज्यावेळी मनमोहनसिंग यांचं सरकार होतं त्यावेळी इंधनाचे दर ७० रुपये झाल्यावर अभिनेता अमिताभ बच्चन, अभिनेता अक्षय कुमार हे ट्विटरवरुन टीव टीव करयाचे आणि आता पेट्रोलचे दर १०० रुपये झाल्यावरही गप्प का आहेत? अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचे शूटिंग किंवा सिनेमा तसेच अक्षय कुमारच्या सिनेमाचे सिनेमा आणि शूटिंग आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.

कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅली

मोदी सराकरने लागू केलेल्या तीन नवीन कृषी कायदे रद्द करावेत तसेच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी इंधन दरवाढ भाजप सरकारने मागे घ्यावी या मागणीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेत्रृत्वाखाली भंडारा येथे ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती.

भाजपचं नाना पटोले यांना प्रत्युत्तर

भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं, "अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना काँग्रेसचे नेते धमकी देत आहेत. त्यांच्या सिनेमाचे शूटिंग होऊ देणार नाही असं म्हणत आहेत. काय गुन्हा आहे अमिताभ बच्चन यांचा? देश हितासाठी त्यांनी ट्विट केलं हा गुन्हा होऊ शकतो का? परदेशातील काही लोक षडयंत्राद्वारे भारतला बदनाम करत आहेत आणि काँग्रेस त्यांच्या समर्थनार्थ उतरत आहेत."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी