MUMBAI Crime : शाळेत जायचे नाही म्हणून ११ वर्षाच्या विध्यार्थ्यांने स्वतःलाच केला किडनॅप

मुंबई
Updated Sep 30, 2022 | 10:50 IST

घाटकोपरमध्ये ( Ghatkopar) एका ११ वर्षाच्या विध्यार्थ्याने शाळेत जायचे नाही म्हणून स्वतःलाच किडनॅप केलं. यामुळे घाटकोपर पोलिसांची काही तास पळता भुई थोडी झाली. परंतु नंतर त्या मुलानेच हा बनाव केला असल्याचे कबूल केले.

मुंबई :  गेल्या काही दिवसात मुंबईमध्ये  (Mumbai) मोठ्या प्रमाणात मुलांच्या अपहरणाचे (Kidnaping) फेक मॅसेज सोशल मीडियात ( Social Media) व्हायरल होत आहेत. याचा वाईट परिणाम आता लहान मुलांवर देखील होताना दिसत आहे. घाटकोपरमध्ये ( Ghatkopar) एका ११ वर्षाच्या विध्यार्थ्याने शाळेत जायचे नाही म्हणून स्वतःलाच किडनॅप केलं. यामुळे घाटकोपर पोलिसांची काही तास पळता भुई थोडी झाली. परंतु नंतर त्या मुलानेच हा बनाव केला असल्याचे कबूल केले. (An 11-year-old student kidnapped himself because he didn't want to go to school )

घाटकोपरच्या अशोक नगर विभागात राहणाऱ्या या ११ वर्षीय मुलाला कमी मार्क्स पडले होते, त्यामुळे शाळेत पडणारा ओरडा नको होता. अशातच मोठ्या भावाच्या मोबाईलवर अपहरणाचे फेक मॅसेज त्याने पाहिले होते. मग आपलेही असे अपहरण  झाल्याचे घरच्यांना सांगितले होतं. 

अधिक वाचा  : उपाशी राहिल्यामुळे खरंच वजन कमी होतं?

घरच्यांनी मुलाला सोबत घेऊन घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. मुलाने आपल्याला शाळेत जात असताना दोन जणांनी चालू रिक्षात ओढून अपहरण करण्याचा प्रयत्न केला.  माझे तोंड दाबले पण मी उडी मारली आणि पळून आलो, असे त्याने पोलीस अधिकाऱ्यांना ही सांगितले.

अधिक वाचा  : धावणं महिलांसाठी फायद्याचं पण पुरुषांसाठी आहे धोकादायक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांनी तात्काळ पथके तयार करून या रिक्षाचा शोध घेण्यास सांगितले. मात्र सीसीटीव्ही आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरुन अशी घटना घडलीच नसल्याचे समोर आले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी