जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या, आता चित्रा वाघांनी काढलं जुनं प्रकरण उकरून

मुंबई
Updated Nov 15, 2022 | 13:14 IST

chitra wagh on jitendra awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड सध्या सतत चर्चेत असतात. दोन दिवसांपूर्वी कळव्यात एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात राज्यात उमटले होते.. त्यानंतर आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांनी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.. त्यांचं एक जून प्रकरण उकरून काढत आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

थोडं पण कामाचं
  • चित्रा वाघ यांचा आव्हाडांवर निशाणा
  • आव्हाडांचा जुन प्रकरण काढलं उकरून
  • घरी बोलावून एकास मारहाण

मुंबई : चित्रपटगृहात एकाला मारहाण आणि कळवा-मुंब्रा पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानंतर आव्हाड हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एक जून प्रकरण उकरून काढत आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. (An old story of Jitendra Awhad was carved by Chitra Vagh)

अधिक वाचा : Mahad Gas Leak: महाड एमआयडीसीमध्ये दुर्घटना, नेमकं काय झालं? वाचून हादरा बसेल...

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका महिलने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. विनयभंगाच्या या आरोपांनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. जितेंद्र आव्हाड यांच्या या इशाऱ्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली.

अधिक वाचा : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा, शिंदे आणि ठाकरे गटात हाणामारी

आव्हाडांवर हल्ला चढवत चित्रा वाघ म्हणाल्या, 'आपण संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत, असं आव्हाड कायम सांगतात, मग त्यांना वाटत असेल गुन्हा केलेला नाही, तर त्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवावा. आता गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे पोलीस तपास होईल. आमदारकीचा राजीनामा देऊ, असं म्हणून पोलिसांवर जर दबाव आणण्याचा प्रयत्न असेल, तर ते कधीही शक्य होणार नाही. 'ज्यांनी घरी बोलावून एकाला बेदम मारहाण केली, त्यांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,' असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी