Ananya Pandey quizzed by NCB अनन्या पांडेची एनसीबी शुक्रवारी पण करणार चौकशी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 21, 2021 | 20:21 IST

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिची एनसीबीने आज ड्रग प्रकरणात चौकशी केली. एनसीबी अनन्याची उद्या (शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१) पण चौकशी करणार आहे.

Ananya Pandey quizzed by NCB for 2 hrs
अनन्या पांडेची एनसीबी शुक्रवारी पण करणार चौकशी 
थोडं पण कामाचं
  • अनन्या पांडेची एनसीबी शुक्रवारी पण करणार चौकशी
  • आज (गुरुवार २१ ऑक्टोबर २०२१) अनन्याची २ तास चौकशी
  • आर्यन खान आणि अरबाझ मर्चंटला ड्रग पार्टी केसमध्ये ३० ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिची एनसीबीने आज ड्रग प्रकरणात चौकशी केली. ड्रग पार्टी केसमधील आरोपी आर्यन खान याच्यासोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनन्याचे नाव आढळले. यानंतर एनसीबीने आज (गुरुवार २१ ऑक्टोबर २०२१) अनन्याला चौकशीसाठी हजर होण्याचे समन्स बजावले. समन्स स्वीकारुन अनन्या एनसीबी समोर हजर झाली. काही प्रश्न विचारल्यानंतर अनन्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एनसीबी अनन्याची उद्या (शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१) पण चौकशी करणार आहे.

चौकशीचा भाग म्हणून एनसीबीने अनन्याचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. एनसीबीचे तंत्रज्ञ अनन्याच्या मोबाइल आणि लॅपटॉपमधील माहितीची तपासणी करत आहेत.

आर्यन खान हा बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आहे तर अनन्या पांडे ही बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी आहे. यामुळे एनसीबीच्या चौकशीकडे अनेकांचे लक्ष आहे. 

मुंबईतील एनडीपीएस विशेष न्यायालयाने आर्यन खान आणि अरबाझ मर्चंटला ड्रग पार्टी केसमध्ये ३० ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. यामुळे आर्यन आणि अरबाझचा मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मुंबईच्या उच्च न्यायालयात आर्यनच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आर्यनकडून ही सुनावणी लवकर व्हावी यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे.

एनसीबीने अनन्याला दुपारी २ वाजता हजर होण्यास सांगितले होते. पण अनन्या संध्याकाळी चारच्या सुमारास एनसीबीच्या समोर हजर झाली. अनन्या सोबत चंकी पांडे पण होता. तब्बल दोन तास अनन्याची चौकशी झाली. यानंतर अनन्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एनसीबी अनन्याची उद्या (शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१) पण चौकशी करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी