Antilia Bomb Scare Case: सचिन वाझेंना घेऊन NIAच्या टीमचं अँटिलियाबाहेर रिक्रिएशन

NIA recreates the crime scene near Antilia: मुंबईत आढळलेल्या स्फोटक प्रकरणी एनआयएच्या टीमने सचिन वाझे यांना घेऊन घटनास्थळी रिक्रिकेशन केलं आहे. रात्री उशीरा हे रिक्रिएशन करण्यात आले. 

Antilia Bomb Scare Case NIA forced sachin vaze to walk wearing kurta recreates the crime scene near Antilia
NIA recreates the crime scene near Antilia  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अँटिलिया बाहेर सचिन वाझे यांना घेऊन एनआयएने केलं सीनचं रिक्रिएशन
  • एनआयएने सचिन वाझे यांना सफेद कुर्ता घालून चालायला सांगितले 
  • अँटिलियाबाहेर सीसीटीव्ही फूटेजमध्ये पीपीई किट घालून चालताना दिसलेला एक व्यक्ती

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया (Antilia) घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीत आढळलेल्या स्फोटक प्रकरणात तपास करत असलेल्या एनआयएच्या टीम (NIA team)ने घटनास्थळी रिक्रिएशन (recreation) केलं आहे. शुक्रवारी (१९ मार्च २०२१) रात्री अकराच्या सुमारास एनआयएची टीम सचिन वाझे (Sachin Vaze) यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाली आणि रिक्रिएशन करण्यात आलं. (Antilia Bomb Scare Case NIA forced sachin vaze to walk wearing kurta recreates the crime scene near Antilia)

अँटिलिया घराजवळील स्फोटक प्रकरणात सीसीटीव्ही फूटेज समोर आले होते ज्यामध्ये एक व्यक्ती पीपीई किट घालून चालताना दिसत आहे. एनआयएला संशय आहे की पीपीई किटमध्ये दिसणारा व्यक्ती हा दुसरा कुणी नाही तर अटकेत असलेले सचिन वाझे हेच आहेत. इतकेच नाही तर पीपीई किटच्या आत जो कुर्ता आणि पायजमा घालण्यात आला होता तो नंतर जाळल्याचाही एनआयएला संशय आहे.

यामुळेच शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एनआयएच्या टीमने सचिन वाझे यांना सफेद कुर्ता घालून त्या रस्त्यावर चालण्यास सांगितले. यावेळी एनआयएच्या टीमने रस्त्यावरील काही लाईट्स बंद केल्या होत्या आणि सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत असलेल्या मार्गावरुन सचिन वाझे यांना चालायला सांगितले. यावेळी एनआयएने रस्त्यावर मार्किंग सुद्धा करुन ठेवले होते आणि त्या मार्गावरुनच वाझे यांना चालायला सांगितले. 

सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे एनआयएने सचिन वाझे यांच्या डोक्यावर रुमाल बांधून ढगळा कुर्ता घालून चालायला सांगितलं. या सीन रिक्रिएशन एनआयएने संपूर्ण चित्रिकरणही केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी