आर्यन खान कैदी नंबर N956

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 15, 2021 | 01:59 IST

ड्रग पार्टी प्रकरणी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी झालेल्या आर्यन खान याची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये झाली. क्वारंटाइन राहण्याची मुदत संपल्यानंतर आर्यनची रवानगी जेलमधील सामान्य बराकीत झाली.

Aryan Khan allotted Qaidi Number N956 after moving out from quarantine Father Shah Rukh Khan 4500 rupees money order
आर्यन खान कैदी नंबर N956 
थोडं पण कामाचं
  • आर्यन खान कैदी नंबर N956
  • आर्यन खान याची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये
  • जेलच्या नियमानुसार आर्यन खान याला N956 या क्रमांकाचा बिल्ला दिला

मुंबईः ड्रग पार्टी प्रकरणी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी झालेल्या आर्यन खान याची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये झाली. क्वारंटाइन राहण्याची मुदत संपल्यानंतर आर्यनची रवानगी जेलमधील सामान्य बराकीत झाली. ज्यांची कोर्ट केस सुरू आहे अशा कच्च्या कैद्यांना प्रामुख्याने सामान्य बराकीत ठेवले जाते. या बराकीत दाखल होताच आर्यनची ओळख त्याच्या बिल्ल्यावरील क्रमांकावरुन निश्चित करण्यात आली आहे. Aryan Khan allotted Qaidi Number N956 after moving out from quarantine Father Shah Rukh Khan 4500 rupees money order

जेलच्या नियमानुसार आर्यन खान याला N956 या क्रमांकाचा बिल्ला दिला आहे. बिल्ल्यावर नमूद असलेला क्रमांक हीच आर्यनची ओळख आहे. जेलच्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांची खरेदी करण्यासाठी घरुन आर्यनला ४५०० रुपयांची मनीऑर्डर पाठवण्यात आली आहे. 

एरवी मन्नत बंगल्यात ऐषारामात जगणारा आर्यन आता जेलमध्ये आहे. मुंबईच्या विशेष एनडीपीएस कोर्टाने आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तीन आरोपींच्या जामीन अर्जावरील निर्णय २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत राखून ठेवला आहे. यामुळे २० ऑक्टोबर पर्यंत आर्यन आणि त्याच्या मित्रांना जेलमध्येच दिवस काढायचे आहेत. 

जेलचे जेवण आवडत नाही म्हणून आर्यन मागील काही दिवसांपासून जेलच्या कँटिनमधील बिस्किटे खाऊन दिवस काढत असल्याचे वृत्त आहे. आर्यन आणि त्याची मित्र मंडळी जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे आर्थर रोड जेलमध्येच आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी