Aryan Khan gets clean chit in drugs case, NCB submits its chargesheet : मुंबई : ड्रग केसमध्ये एनसीबीकडून आर्यन खानला क्लीनचीट मिळाली. आर्यन खान हा बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आहे. आर्यन विरोधात ठोस पुरावा नसल्यामुळे त्याचा समावेश आरोपपत्रात करण्यात आलेला नाही. एनसीबीने ड्रग केसमध्ये सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. तपास सुरू असताना ज्या २० जणांवर आरोप करण्यात आले त्यापैकी १४ जणांचा आरोपी म्हणून आरोपपत्रात उल्लेख आहे. बाकीच्या सहा जणांविरोधात ठोस पुरावे नसल्यामुळे आरोपपत्रात त्यांचा आरोपी म्हणून उल्लेख केलेला नाही. त्यांना क्लीनचीट देण्यात आली आहे. क्लीनचीट दिलेल्या सहा जणांमध्ये आर्यन खान याचा समावेश आहे.
आर्यनजवळ ड्रग मिळाले नाही. याच कारणामुळे ठोस पुराव्यांअभावी त्याला क्लीनचीट देण्यात आली, असे सूत्रांकडून समजते. याआधी आर्यन खान याला ऑक्टोबर २०२१ मध्ये अटक करण्यात आली. आर्यन २२ दिवस जेलमध्ये होता. मुंबईच्या हायकोर्टाने आर्यन खान याला २८ ऑक्टोबर २०२२ रोजी सशर्त जामीन दिला. सर्व प्रक्रिया पूर्ण करून ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आर्यन खान मुंबईच्या आर्थर रोड जेलबाहेर आला.
आर्यन खान २ ऑक्टोबर २०२२ रोजी क्रूझवरील पार्टीसाठी घरातून निघाला. एनसीबी मुंबईच्या टीमने ठोस माहितीआधारे कॉर्डेलिया क्रुझ आणि मुंबईचे क्रुझ टर्मिनल या दोन ठिकाणी कारवाई करून धरपकड केली. ड्रग केस प्रकरणी एनसीबीने २० जणांविरोधात आरोप केले. पुढे या प्रकरणाचा तपास एनसीबी मुख्यालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडे हस्तांतरित करण्यात आला. तपासाअंती सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल झाले. या आरोपपत्रात चौदा जणांना आरोपी करण्यात आले आहे. ज्या सहा जणांचा ठोस पुरावे नाही म्हणून आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश केलेला नाही त्यात आर्यन खान आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.