Aryan Khan Granted Bail आर्यनला जामीन पण आजचा मुक्काम जेलमध्येच!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 28, 2021 | 18:28 IST

ड्रग पार्टी केसमध्ये आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तीन आरोपींना मुंबईच्या उच्च न्यायालयाने आज (गुरुवार २८ ऑक्टोबर २०२१) जामीन दिला.

Aryan Khan Granted Bail
आर्यनला जामीन पण आजचा मुक्काम जेलमध्येच! 
थोडं पण कामाचं
  • आर्यनला जामीन पण आजचा मुक्काम जेलमध्येच!
  • न्यायालयाचा आदेश जेल प्रशासनाला आज मिळणार नाही
  • आदेश मिळेपर्यंत आर्यन, अरबाझ आणि मुनमुन या तीन आरोपींचा मुक्काम मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्येच

मुंबईः ड्रग पार्टी केसमध्ये आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तीन आरोपींना मुंबईच्या उच्च न्यायालयाने आज (गुरुवार २८ ऑक्टोबर २०२१) जामीन दिला. पण न्यायालयाचा आदेश जेल प्रशासनाला आज मिळणार नाही. हा आदेश मिळेपर्यंत आर्यन, अरबाझ आणि मुनमुन या तीन आरोपींचा मुक्काम मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्येच राहणार आहे. Aryan Khan Granted Bail from Bombay High Court

उच्च न्यायालयाने जामीन देत असल्याचा संक्षिप्त निर्णय जाहीर केला. संपूर्ण निकालपत्र उच्च न्यायालय उद्या (शुक्रवार २९ ऑक्टोबर २०२१) रोजी जाहीर करणार आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची की, तपास पूर्ण करुन आरोपपत्र दाखल करायचे याचा निर्णय एनसीबी संपूर्ण निकालपत्र हाती आल्यानंतर घेणार आहे. 

याआधी ड्रग पार्टी प्रकरणात आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा या आरोपींना २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने क्रूझवरील ड्रग पार्टीच्या केसमध्ये ताब्यात घेतले आणि ३ ऑक्टोबर रोजी अटक केले. यानंतर आरोपी एनसीबीच्या कोठडीत होते. न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी आर्यन, अरबाझ, मुनमुन या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. पण निकाल जाहीर होईपर्यंत उशीर झाला होता, त्यामुळे आरोपींना रात्रभर एनसीबीच्या कोठडीत ठेवून ८ ऑक्टोबर रोजी आर्थर रोड जेलमध्ये नेण्यात आले. न्यायालयीन कोठडी संपण्याच्या सुमारास झालेल्या सुनावणीवेळी आरोपींना ३० ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. अखेर आरोपींनी मुंबईच्या उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी धाव घेतली. उच्च न्यायालयाने आरोपींना जामीन देत असल्याचे गुरुवार २८ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी