Beed: बीडः बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच अतिवृष्टीने आधीच कंबरड मोडलेलं असताना, पुन्हा निसर्ग त्यांची अग्नी परीक्षा घेतो आहे. अतिवृष्टीमुळे तयार शेत वाहून गेलच होतं, आता उरल्या सुरल्या पिकांवर धुकं पडल्यामुळे ते ही हातच निघून जाण्याची दाट शक्यात आहे. शेतीत झालेल्या अपरिमित हानीमुळे मागच्याच वर्षात 268 शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव संपवला होता. या वर्षाच्या सुरवातीलाच बळीराजाला मिळालेलं हे गिफ्ट, वर्ष सरता सरता आत्महत्येचा आकडा वाढवून जायला नको.
अधिक वाचाः Weather Update : देशात थंडीचा कहर; विदर्भात तापमानाने मोडला रेकॉर्ड, उत्तरेतील वाहतुकीवर परिणाम
रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानाकडे एक नजर टाकूयाः
नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार संपूर्ण जगात दुसऱ्या क्रमांकाची शेतजमीन भारताकडे आहे. सुमारे 60% ग्रामीण भारतीय कुटुंबाचे पोट अजुनही शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. अशा सामाजिक परिस्थितीत बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यायला सरकार सरसावेल का याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.