Ashish Shelar : राहुल गांधी यांचे वक्तव्य बेअक्कलपणाचे, भाजप नेते आशिष शेलार यांची टीका

मुंबई
Updated Nov 17, 2022 | 20:52 IST

Ashish Shelar : वीर सावरकर यांनी ब्रिटिशांकडे माफी मागितली होती असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. त्यावरून भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांचे विधान बेअक्कलपणाचे आहे अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच याबाबत उद्धव ठाकरे यांनी बोटचेपेपणाची भूमिका का स्विकारली असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला आहे. 

थोडं पण कामाचं
  • वीर सावरकर यांनी ब्रिटिशांकडे माफी मागितली होती असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते.
  • त्यावरून भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
  • राहुल गांधी यांचे विधान बेअक्कलपणाचे आहे अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

Ashish Shelar : मुंबई : वीर सावरकर यांनी ब्रिटिशांकडे माफी मागितली होती असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. त्यावरून भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांचे विधान बेअक्कलपणाचे आहे अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच याबाबत उद्धव ठाकरे यांनी बोटचेपेपणाची भूमिका का स्विकारली असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला आहे.  (bjp leader ashish shelar criticized rahul gandhi over savakar statement)

आशिष शेलार म्हणाले की, राहुल गांधी यांनी हिरवा झेंडा आणि हिरव्या मतांचाच अभ्यास केला आहे. राहुल गांधी यांचे विधान बेअक्कलपणाचे आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी बोटाचेपेपणाची भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपेपणाची भूमिका घेतली. केवळ मी, माझ्या पक्षाला सत्ता देणारे सहकारी यासाठी वडिलांचे जे विचार होते त्यालाही तिलांजली देऊन उद्धव ठाकरे यांनी बोटचेपेपणाची भूमिका का घेतली असा सवाल शेलार यांनी केला आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी