Kirit Somaiya : किरीट सोमय्या कर्जत तहसीलदार कार्यालयात, उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या जमिन व्यवहाराची होणार चौकशी

मुंबई
Updated Nov 17, 2022 | 19:58 IST

Kirit Somaiya : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांनी वैजनाथ देवस्थानची जमीन घेतली होती असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी आज किरीट सोमय्या कर्जतच्या तहसीलदार कार्यालयात आले होते. सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकारच्या काळात हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला.

थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांनी वैजनाथ देवस्थानची जमीन घेतली होती
  • असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
  • या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी आज किरीट सोमय्या कर्जतच्या तहसीलदार कार्यालयात आले होते.

Kirit Somaiya : रायगड : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांनी वैजनाथ देवस्थानची जमीन घेतली होती असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी आज किरीट सोमय्या कर्जतच्या तहसीलदार कार्यालयात आले होते. सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकारच्या काळात हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. परंतु या व्यवहारात आता कुणीतरी बिलखिया आला ;बिलखियाकडे गेलीच कशी ? याची योग्य चौकशी व्हावी यासाठी सोमय्या यांनी तहसलिदारांची भेट घेतली आहे. या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही करणार असेही सोमय्या म्हणाले. तसेच मी दहावीपासून सर्व पदव्या मेरीटवर मिळवल्या आहेत असे सोमय्या म्हणाले. २० वर्षानंतर उद्धव ठाकरे यांना मी पीएचडी झाले हे कळाले हे आश्चर्य आहे. उद्धव ठाकरेंनी मी माझ्या प्रबंधही पाठवला होता. उद्धव ठाकरेंना अशा प्रकारे स्वस्तातल्या प्रसिद्धीसाठी वक्तव्य करावी लागतात हे दुर्दैवं असेही सोमय्या यांनी नमूद केले. (bjp leader kirit somaiya demand shreedhar patankar land deal in karjat)

अधिक वाचा : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अमरावतीच्या तरुणीसोबतही घडली धक्कादायक घटना


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी