Chandrashekhar Bawankule : नैतिकता शिल्लक असेल तर आव्हाडांना निलंबीत करा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई
Updated Nov 14, 2022 | 20:26 IST

Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसकडे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना निलंबीत करावे अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच सहानुभूती मिळवण्यासाठी आव्हाडांनी राजीनामा दिला असेही बावनकुळे म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादी काँग्रेसकडे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना निलंबीत करावे
  • अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
  • तसेच सहानुभूती मिळवण्यासाठी आव्हाडांनी राजीनामा दिला असेही बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना निलंबीत करावे अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच सहानुभूती मिळवण्यासाठी आव्हाडांनी राजीनामा दिला असेही बावनकुळे म्हणाले. (bjp maharashtra state president chandrashekhar bawankule criticized ncp over jitendra awhad)

अधिक वाचा : उकळत्या वरणात पडला 5 वर्षाचा मुलगा, तडफडून झाला मृत्यू

माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांनी आनंद करमुसे या व्यक्तीला बंगल्यावर नेऊन मारहाण केली. त्याविरोधातही गुन्हा दाखल केला नव्हता. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही आहे. राष्ट्रवादीकडे काही नैतिकता शिल्लक असेल तर शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना निलिंबीत करावे अशी मागणी बावनकुळे यांनी केली.  तसेच पक्षाने त्यांना पुढील निवडणुकीत तिकीट देऊ नये. देवेंद्र फडणवीस कधीही आकसाने कारवाई करत नाहीत. पाच वर्षे त्यांच्याकडे गृहमंत्रिपद होते तेव्हा त्यांनी कधीही विनाकारण कुणाला तुरुंगात डांबले नाही. आव्हाडांच्या या कृतीमुळे संताप व्यक्त होत आहे. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी आव्हाडांनी राजीनामा दिला आहे असे बावनकुळे म्हणाले. अब्दुल सत्तार यांनी जेव्हा सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जे अपशब्द काढले तेव्हा आम्ही त्यांचा निषेध केला. आम्ही सत्तारांच्या वक्तव्याचे कधीच समर्थन केले नाही. जितेंद्र आव्हाड यांनी महिलेला हाताने बाजूला केले. अशा प्रकारे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी करू शकता का ? एखादी महिला जेव्हा समोरून येते तेव्हा त्यांना आपण मागे व्हायचे की त्यांना धक्का देऊन पुढे जायचं? जितेंद्र आव्हाडांनी ही चूक केली आहे आणि त्यांनी ती मान्य करावी असेही बावनकुळे यांनी नमूद केले. 

अधिक वाचा :  उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी शिंदे गटाच्या वाटेवर


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी