[VIDEO]: शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाही तर 'ही' मंत्रीपद देण्यास भाजप तयार

मुंबई
Updated Oct 30, 2019 | 13:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

BJP likely to give some important posts to Shiv Sena: राज्यात सत्ता स्थापनेला आता वेग आल्याचं दिसत आहे. त्यातच सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपने काही महत्वाची खाती शिवसेनेला देण्याची तयारी केल्याची माहिती आहे.

bjp ready to give some important portfolio shiv sena but not chief minister post sources vidhan sabha election result 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

 • शिवसेना-भाजपची महायुती स्थापन करणार सत्ता
 • लवकरच ठरणार शपथविधीचा मुहूर्त
 • भाजपकडून शिवसेनेला उमुख्यमंत्री पद देण्याची शक्यता

मुंबई: दिवाळी संपल्यानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे. सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आफल्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. तर असा कुठलाही फॉर्म्युला ठरला नसल्याचं भाजप सांगत आहे. त्यातच आता भाजपने पुढाकार घेत शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि दोन महत्वाची मंत्रीपदे देण्याचं ठरवलं असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. यासोबतच महत्वाची खाते ज्यामध्ये कृषीमंत्री आणि अर्थमंत्री पदांचा समावेश आहे. मात्र, भाजप मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यास तयार नाहीये. दोन महत्वाच्या मंत्रीपदांसोबतच इतरही मंत्रिपदे शिवसेनेला भाजपकडून देण्यात येणार आहेत.

भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजेच १०५ जागा जिंकल्या आहेत. सोबतच अपक्ष आमदारांनाही भाजपने सोबत घेत आपली ताकद वाढवली आहे. निवडणुकीपूर्वीच शिवसेनेकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी रणनिती आखण्यात येत होत्या. आता भाजपकडून उपमुख्यमंत्री पद देण्यात येत असल्याने शिवसेना याकडे कसं पाहून आपला निर्णय घेतं हे पाहवं लागेल.

शिवसेना उपमुख्यमंत्री पदावर सत्ता स्थापनेसाठी तयार झाली तर उपमुख्यमंत्री पद आदित्य ठाकरेंना मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होत आहे. उद्या शिवसेनेने आपल्या आमदारांची बैठक बोलावली असून या बैठकीत उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे.

विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी भाजपच्या आमदारांची बैठक दुपारी होत आहे. या बैठकीत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

निवडणुकीनंतर पक्षीय बलाबल

 1. भाजप - १०५ 
 2. शिवसेना - ५६ 
 3. राष्ट्रवादी - ५४ 
 4. काँग्रेस - ४४ 
 5. इतर - १३ 
 6. बहुजन विकास आघाडी - ३ 
 7. एमआयएम - २ 
 8. समाजवादी पक्ष - २ 
 9. प्रहार जनशक्ती पक्ष - २ 
 10. मनसे - १ 
 11. स्वाभिमानी पक्ष - १ 
 12. सीपीआय - १ 
 13. जन सुराज्य शक्ती - १ 
 14. क्रांतिकारी शेतकरी पक्ष - १
 15. शेकाप - १ 
 16. राष्ट्रीय समाज पक्ष - १ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...