Horoscope: मुख्यमंत्री शिंदे ज्योतिषीला भेटले, कोणाचं पाहिलं भविष्य?

मुंबई
Updated Nov 24, 2022 | 16:25 IST

Eknath Shinde Horoscope: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या बरीच टीका होत आहे. मुख्यमंत्री ज्योतिषीला भेटून भविष्य जाणून घेत असल्याचं वृत्त समोर येताच विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिषीला का भेटले?
  • शिर्डीच्या साईबाबा दर्शनानंतर एकनाथ शिंदे सिन्नरकडे का वळाले?

Eknath Shinde: मुंबई: महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा देखील महाराष्ट्रात लागू आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं नेतृत्व देखील तशाच कृतीचं असावं अशी सर्वसाधारण धारणा आहे. मात्र, राज्यातील सरकारची, विशेषत: मुख्यमंत्र्यांची कृती मात्र तशी अजिबात दिसत नाही. कारण स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच एका ज्योतिषीकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. मात्र, याबाबत एकनाथ शिंदेंकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही
 

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे असलेल्या श्रीक्षेत्र ईशान्येश्वर मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी येथील ज्योतिषीकडून आपलं राजकीय भविष्य पाहिल्याचं समजतं आहे. ज्यावरुन आता त्यांना बरंच टार्गेट केलं जात आहे 

अधिक वाचा: प्रताप सरनाईकांनी तब्बल 75 तोळे सोनं तुळजाभवानी मातेला केलं अर्पण

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिर्डी दौरा हा आयोजित होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेऊन अचानक आपला ताफा सिन्नरच्या दिशेने वळवला. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सिन्नरचा उल्लेख नव्हता. मात्र, येथील श्री ईशान्येश्वर मंदिरात जाऊन अभिषेक करावं असं मुख्यमंत्र्यांच्या मनात आलं आणि त्यांनी लागलीच त्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सिन्नरच्या ईशानेश्वर मंदिरात एक राजकीय ज्योतिष बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत.

याच ज्योतिष बाबांकडून शिंदेंना आपलं राजकीय भविष्य काय हे जाणून घ्यायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी कोणतीही आगाऊ सूचना न देता अचानक या मंदिरात जाणं पसंत केलं. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी या मंदिरात महादेवाला अभिषेक केला आणि त्यानंतर ज्योतिष बाबाकडून स्वतःचे भविष्य जाणून घेतल. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि नियोजित बैठका असताना मुख्यमंत्री अचानक शिर्डीला दर्शनासाठी का आले यावरुनही राजकीय वर्तुळात बरीच कुजबूज सुरु आहे.

अधिक वाचा: चंद्रकांत खैरे म्हणाले, 'असे हवन करतो की, तुमचे सरकार आऊटचं होणार'

तसंच मुंबईला जात असलेला मुख्यमंत्र्याचा ताफा सिन्नरच्या दिशेने जेव्हा वळविण्यात आला तेव्हा त्याबाबत स्थानिक प्रशासनालाही फारशी माहिती न देता ही भेट अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली.

दरम्यान, या सगळ्यावरुन आता विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना टार्गेट केलं आहे. शिवसेने नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. याशिवाय अजित पवारांनी देखील मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला आहे. आता या सगळ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही स्पष्टीकरण देणार का? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी