[video) मुंबईतील वाहनांच्या गर्दीवर मुख्यमंत्री ठाकरे भडकले,  निर्बंध कडक करण्याचा दिला इशारा 

मुंबई
Updated May 31, 2021 | 21:14 IST

uddhav thackeray । मुंबईत होणाऱी गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. इतकंच नाही तर मुंबईत अशीच गर्दी होत राहिली तर आणखी कडक निर्बंध करणार असल्याचा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

थोडं पण कामाचं

  • कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही, असे असतानाही मी मेट्रोच्या कार्यक्रमाला येत असताना मला रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी दिसली आणि ही चिंताजनक बाब आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
  • जर लोकांनी असाच मुक्त संचार सुरू केला तर निर्बंध अधिक कडक केले जातील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जनतेला दिला आहे.
  • जनतेशी काल साधलेल्या संवादात मी निर्बंध उठवण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही; मुख्यमंत्र्यांनी जनतेला करून दिली आठवण.

मुंबई :   मुंबईत होणाऱी गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. इतकंच नाही तर मुंबईत अशीच गर्दी होत राहिली तर आणखी कडक निर्बंध करणार असल्याचा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मल्टीप्लीस्टिज पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबईतील आज ट्रॅफिक बघून मी आश्चर्यचकित झालो असेही ते यावेळी म्हणाले, ब्रेक द चेन अंतर्गत महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत निर्बंध वाढवल्याची काल (३१ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज (३१ मे) मुंबईतील मेट्रोच्या २ ए आणि ७ या २ मार्गिकांचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातून झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर अनेक नेते मंडळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'आज रस्त्यावरचं ट्राफिक बघून मी आश्चर्यचकित झालो. मी काल नेमकं काय बोललो अशी एकदा चौकशीही केली. मी चुकून सगळी बंधनं उठवली असं तर म्हणालो नव्हतो ना याबद्दल दोघा तिघांना विचारलं. मुंबई किंवा महाराष्ट्रात आपण बंधनं उठवलेली नाहीत. अजूनही करोनाचा धोका संपलेला नाही. जर का आपण गाफील झालो तर संथगतीने सुरु होणाऱ्या आयुष्याला पुन्हा ब्रेक लागेल. मुंबईत पुन्हा अशीच गर्दी होत राहिली तर निर्बंध कठोर करावे लागतील,' असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

मुंबईतील मेट्रोच्या २ ए आणि ७ या दोन मार्गिकांचं सोमवारी उद्घाटन झालं. यासंबंधी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'निर्बंध जेव्हा उठतील तेव्हा अधिक जोमाने, कित्येक पटीने आपलं आयुष्य गतीमान होण्यासाठी म्हणून ही कामं आहेत'.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी