CM Uddhav Thackeray : येत्या १५ दिवस कडक निर्बंध, ब्रेक द चेन अधिक कठोर

मुंबई
Updated Apr 13, 2021 | 21:35 IST

CM Uddhav Thackeray live :   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. यात ते संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा करू शकतात.

थोडं पण कामाचं

 • राज्यातील कोवीड वाढू नये यासाठी ५ हजार कोटी उपलब्ध करून देणार 
 • रिक्षा चालकांना एकावेळी १५०० रुपये दिले जाणार 
 • शिवभोजन थाळी ही मोफत देणार आहोत, गोरगरिबांसाठी मिळणार 

मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊनची  (Maharashtra Lockdown) तयारी पूर्ण झाली असून लॉकडाऊन न म्हणता कडक निर्बंध  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जनतेशी संवाद साधता लागू केली आहे.  उद्धव ठाकरे यांनी  महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून पुढील १५ दिवसांसाठी कडक बंधने लागू केली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या लाइव्हमधील महत्त्वाचे मुद्दे 

 1. माझ्यावर कोणी टीका करत असेल पण माझी तुमच्याशी बांधिलकी आहे. 
 2. दररोज ५० हजार रेमीडेसिवीर औषधांची गरज आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास १ लाख इंजिक्शनची गरज लागणार आहे. 
 3. राज्यातील कोवीड वाढू नये यासाठी ५ हजार कोटी उपलब्ध करून देणार 
 4. अदिवासी बांधवांना एकावेळी २ हजार (१२ लाख लाभार्थी)
 5. रिक्षा चालकांना एकावेळी १५०० रुपये दिले जाणार 
 6. तळहातावर पोट असणाऱ्यांना अधिकृत फेरीवाल्यांना ५ लाख 
 7. घरगुती कामगारांना निधी देणार 
 8. कामगार कल्याण मंंडळातर्फे १२ लाख लाभार्थींना १५०० रुपये देणार 
 9. ३५ लाख लोकांना आधार देणार आहे. 
 10. शिवभोजन थाळी ही मोफत देणार आहोत, गोरगरिबांसाठी मिळणार 
 11. अन्न सुरक्षा कायद्यातील ७ कोटी लाभार्थींना पुढील महिन्यात प्रत्येकी ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ देणार 
 12. अनावश्यक ये-जा थांबवायची आहे. हॉटेल रेस्टॉरंट बंधन कायम. रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना पॅकिंगसाठी परवानगी 
 13. बांधकाम आणि इतर उद्योगातील कामगारांची व्यवस्था कामाच्या ठिकाणी राहण्याची सुविधा करा. 
 14. रुग्णालय, विमा, वैद्यकीय सेवा डिलर, लस उत्पादक, मास्क जंतू नाशक उत्पादक, कृषी , हवाई वाहतूक, विविध देशांची राजनैतिक कार्यालये. पावसाळेपूर्वीचे कामे देणारे, ई-कॉमर्स. अधिस्वीकृत पत्रकार, डेटा सेंटर सुरू राहणार 
 15. लोकल आणि बसेस सुरू राहणार, अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी ही सेवा सुरू राहणार 
 16. सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार 
 17. करोनाला मदत करणार नाही. मी सरकारला मदत करणार हे ठरवले पाहिजे. 
 18. जनता कर्फ्यु स्वतःहून लागला पाहिजे. 
 19. पुढील १५ दिवस संचारबंदी, अनावश्यक फिरणे टाळले पाहिजे. 
 20. उद्या संध्याकाळ पासून ब्रेक दि चेन साठी राज्यात १४४ कलम लागू करण्यात आला आहे. 
 21. उद्या रात्री आठ वाजेपासून राज्यात निर्बंध कठोरपणे लागू करणार आहे. यात पंढरपूर विधानसभा मतदार संघात निवडणुकीपर्यंत लागू होणार नाही. 
 22. मी संपूर्ण लॉकडाऊन म्हणत नाही. रोजी रोटी महत्त्वाची आहे. पण जीव वाचण्याचे गरजे आहे. 
 23. गेल्या महिन्याभरापासून मी कल्पना देत आहे. 
 24. नाईलाजाने काही बंधने लावण्याची वेळ आली आहे. 
 25. राजकीय पक्षांनी उणीदुणी काढूू नका. आता राजकारण नका करू  
 26. निवृत्त डॉक्टरांनी महाराष्ट्रातील या परिस्थितीशी लढण्यासाठी सरकारच्या मदतीसाठी या 
 27. सर्व उपाय योजना करत आहोत. पण ही उपाय योजना एकतर्फी आहे. यासाठी डॉक्टरांची गरज आहे. 
 28. रुग्णवाढ भयावह आहे. ऑक्सीजनची कमतरता जाणवायला लागत आहे. सुविधांची कमतरता जाणवत आहे. 
 29. आरोग्य सुविधा वाढवली ती तोकडी पडताना दिसत आहे. 
 30. गेल्या वर्षी आपण लाटेला थोपवले आहे. आपण कोविडवर नियंत्रण मिळवून दाखवले होते. 
 31. गेल्या लाटेपेक्षा ही लाट मोठी, हिचा उच्चांक काय हे अजून सांगता येत नाही. 
 32. लसीकरण मोठ्या प्रमाणात केल्याने पुढील लाट थोपविण्यात मदत होईल. 
 33. ही परिस्थिती नैसर्गिक आपत्ती म्हणून समजावी. ज्यांचे रोजगार जाणार आहेत. त्यांना वैयक्तीक मदत देण्याची विनंती करणार आहे. 
 34. जीएसटीचा परतावा तीन महिने मुदत वाढ द्यावी अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार आहोत. 
 35. ऑक्सीजनसाठी व्यक्तीगत फोन करणार आणि पत्रही पाठविणार आहे. 
 36. हवाई वाहतुकीने ऑक्सीजन पुरवठा करण्याची विनंती पंतप्रधानांना करत आहोत. रस्ते वाहतुकीने पुरवठा करणे विलंबाने होणार आहे.
 37. पंतप्रधानांकडे ऑक्सीजनसाठी विनंती केली आहे. 
 38. मृत्यूचा आकडा आणि रुग्णांचा आकडा आम्ही लपवत नाही आहोत. 
 39. रेमेडिसेवीरचा पुरवठा कमी होऊ देणार नाही. 
 40. १२०० मेट्रीक टन ऑक्सीजन दररोज करत आहे. त्यातील ९०० मेट्रीक टन ऑक्सीजन आपण वापर करत आहोत. 
 41. सर्वांशी चर्चा करत आहे. मतमतांतरे आहेत.ते राहणार पण परिस्थिती बाहेर जात कामा नये. 
 42. शैक्षणिक परीक्षा पुढे ढकलता येतात, आपली परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकत नाही. 
 43. एमपीएससी, दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. 
 44. कोविड सेंटर वाढवले आहे. बेडची संख्या साडे तीन लाख झाली आहे. 
 45. चाचणी केंद्रांवर भार वाढत आहे. राज्यातील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 
 46. कोविड यंत्रणेवर भार वाढत आहे.
 47. आज ६० हजार २१२ नवे रुग्ण राज्यात आढळले आहेत. 
 48. पुन्हा युद्धाला सुरूवात झाली आहे. 
 49. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा - उद्धव ठाकरे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी