Chitra Wagh on Urfi Javed, मुंबई : उर्फी जावेद हिच्या सार्वजनिक ठिकाणी केलेल्या पेहरावावरून भाजप आक्रमक झाले आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आता या प्रकरणी महिला आयोगाला धारेवर धरले आहे. त्यांनी महिला आयोग या प्रकरणात स्वतःहून कारवाई करणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. (Chitra Wagh attacked the Commission for Women in the Urfi case)
महिला आयोगाने भाषण बाजी न करता कृती करावी, भर रस्त्यावर उर्फीच्या शरिरप्रदर्शनाचे महिला आयोग समर्थन करते का? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये, महिला आयोगानं स्वतः याची दखल का घेत नाही. विरोध उर्फी या व्यक्तीला नाही, सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे, कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ?
सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे @Maha_MahilaAyog समर्थन करतंय का ? असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये, महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब ? #सामाजिकभान #स्वैराचारालाविरोध असे हॅशटॅग वापरून चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.