VIDEO: भिवंडीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

मुंबई
Updated Jan 06, 2021 | 13:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांनी शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात अनधिकृत बॅनरबाजीविरोधात निवडणूक कार्यालयात तक्रार दाखल केली. 

shivsena
VIDEO:भिवंडीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा 

थोडं पण कामाचं

  • शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश गुलवी यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रवीण गुळवी यांच्या बॅनरला विरोध केला.
  • दरम्यान, या घटनेवरून महाराष्ट्र सरकारमध्ये मित्र असलेल्या दोन्ही पक्षांचे एकमेकांशी पटत नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे

मुंबई: अनधिकृत बॅनरचा(unauthorised banner) वापर केल्याप्रकरणी मंगळवारी भिवंडी(bhiwandi) येथील निवडणूक कार्यालात(election office) महाविकास आघाडीमधील(mahavikasaghadi) सहकारी पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. शिवसेनेच्या उमेदवाराने अनधिकृत बॅनर लावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी तक्रार दाखल केली आहे. सुरूवातीला दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश गुलवी यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रवीण गुळवी यांच्या बॅनरला विरोध केला. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा वाद सुरू झाला. या हाणामारीचा व्हिडिओही समोर आला आहे. यात निवडणूक कार्यालयात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हाणामारी करताना दिसत आहेत तसेच एकमेकांवर खुर्च्याही फेकून मारत आहेत. 

दरम्यान, या घटनेवरून महाराष्ट्र सरकारमध्ये मित्र असलेल्या दोन्ही पक्षांचे एकमेकांशी पटत नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भिवंडी निवडणूक आयुक्त डॉ. सुनील भालेराव यांनी दोन्ही पक्षांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याविरोधात सरकारी कामांमध्ये व्यत्यय आणल्याप्रकरणी स्थानिक शांतीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास केला जात आहे. हे संपूर्ण प्रकरण केवळ अनधिकृत बॅनरमुळे घडलेले नसून या हाणामारीवरून दोन्ही पक्षांना निवडणूक जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. भिवडी महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरोधात असतात. 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी विश्वास व्यक्त केला होता की काहीही झाले तरी ते सरकार कोसळू देणार नाहीत. ते म्हणाले होते की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरार स्थिर असून ते आपला कार्यकाळ नक्कीच पूर्ण करतील. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले होते. ते म्हणजेच भाजपवाले दोन महिन्यात सरकार पाडणार होते, त्यानंतर ते म्हणाले सहा महिन्यात त्यानंतर आठ महिन्यात, मात्र अद्याप काही घडू शकलेले नाही. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी