Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांनी कोणतीही बैठक बोलवली नाही - संजय राऊत 

मुंबई
Updated Jun 23, 2022 | 12:57 IST

मुंबई :  शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सक्षम आहे. काल रस्त्यावर जे लोक होते ती शिवसेना असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

थोडं पण कामाचं
  •  शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सक्षम आहे.
  • काल रस्त्यावर जे लोक होते ती शिवसेना असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 
  • मुख्यमंत्र्यांनी कोणतीही बैठक बोलवली नाही, बैठक नाही फक्त आमदार भेटणार आहेत.

मुंबई :  शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सक्षम आहे. काल रस्त्यावर जे लोक होते ती शिवसेना असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी कोणतीही बैठक बोलवली नाही, बैठक नाही फक्त आमदार भेटणार आहेत. अजूनही काही गेलेले आमदार आमच्या संपर्कात आहे आणि त्यानंतर २ दोन आमदार शिंदे  कडून आलेत त्यांची पत्रकार  परिषद होणार आहे. 

शिंदे गटातून बाहेर आलेल्या नितीन देशमुख कैलास पाटील  हे पत्रकार परिषद घेणार आहेत, हे दोन आमदारांची दुपारी १२ नंतर शिवालय किंवा वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

 या आमदारांनी परत निवडुन येऊन दाखवाव,  यांना मी बंडखोर नाही बदमाश म्हणेल  २० लोक आमच्या संपर्कात  फक्त बाळासाहेबांचे भक्त बोलुन होत नाही दबावाला बळी पळुन बाहेर जात नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी