Dead Body in Bus : लक्झरी बस मध्ये रक्तबंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह

Dead Body in Bus : मुंबईत एका लक्झरी बसमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घाटकोपर स्थानकाहून राजस्थानच्या उदयपूरसाठी एक लक्झरी बस निघाली होती. तेव्हा ठाण्याच्या घोडबंदर येथे एका प्रवाशाचा मृतदेह आढळला आहे.

dead body
मृतदेह  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईत एका लक्झरी बसमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला आहे.
  • घाटकोपर स्थानकाहून राजस्थानच्या उदयपूरसाठी एक लक्झरी बस निघाली होती.
  • तेव्हा ठाण्याच्या घोडबंदर येथे एका प्रवाशाचा मृतदेह आढळला आहे.

Dead Body in Bus : मुंबई : मुंबईत एका लक्झरी बसमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घाटकोपर स्थानकाहून राजस्थानच्या उदयपूरसाठी एक लक्झरी बस निघाली होती. तेव्हा ठाण्याच्या घोडबंदर येथे एका प्रवाशाचा मृतदेह आढळला आहे. (dead body found in luxury bus in mumbai police probe)

बसमध्ये हा प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. प्रवासी आणि बसचालाकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले. परंतु या व्यक्तीचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रवाशाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी