Devendra Fadnvis । प्रियंका गांधींनी महाराष्ट्र सरकारला सल्ले का दिले नाही : फडणवीस 

मुंबई
Updated Apr 21, 2021 | 19:45 IST

काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवार हे जाणून बुजून एका रणनिती नुसार केंद्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.

थोडं पण कामाचं

  • काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवार हे जाणून बुजून एका रणनिती नुसार केंद्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.
  • काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
  • केंद्राला बदनाम करण्याचा काँग्रेसचा डाव विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई :  काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवार हे जाणून बुजून एका रणनिती नुसार केंद्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा एक भाग म्हणून आज काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी वक्तव्य केले असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

प्रियंका गांधी ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यानुसार त्यांनी काँग्रेसचे राज्य असलेल्या सरकारांना हे प्रश्न उपस्थित केले का. त्यांच्या जीवावर महाराष्ट्रात सरकार आहे. त्या महाराष्ट्रातील सरकारला प्रश्न केला आहे का. आज महाराष्ट्रात कोरोनाची वाईट परिस्थिती आहे. देशात जे काही मृत्यू झाले आहेत. त्यातील ४८ ते ५० टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. देशातील कोरोनाच्या जितक्या केसेस झाल्या आहेत. त्यातील ३५ ते ४० टक्के केसेस या महाराष्ट्रात आढळल्या आहेत.  तसेच देशातील अॅक्टीव्ह पेशंट पैकी ३५ ते ३७ टक्के हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. 

पहिल्या लाटेत महाराष्ट्र सर्वाधिक बाधित होता तर त्यांनी याची तयारी का केली नाही.  प्रियंकाजी, राहुलजी, सोनियाजी आणि मनमोहनसिंगजी यांनी गेल्या चार दिवसात जो नरेटीव्ह सेट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्या. त्यावेळी हे सर्व सल्ले त्यांनी महाराष्ट्राला का दिले नाही.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी