Drug Case चॅटमधून खुलासा, अनन्या आर्यनला म्हणालेली, मी गांजाची व्यवस्था करू शकेन!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 22, 2021 | 16:08 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चॅटमधून मोठा खुलासा झाला आहे. चॅट करताना अनन्याने आर्यनला मी गांजाची व्यवस्था करू शकेन, असे स्पष्ट सांगितल्याचे समजते.

Drug Case : Ananya Panday's chats reveal she agreed to arrange ganja for Aryan Khan, NCB quizzed Ananya
Drug Case चॅटमधून खुलासा, अनन्या आर्यनला म्हणालेली, मी गांजाची व्यवस्था करू शकेन! 
थोडं पण कामाचं
  • Drug Case चॅटमधून खुलासा, अनन्या आर्यनला म्हणालेली, मी गांजाची व्यवस्था करू शकेन!
  • ड्रग केसमध्ये एनसीबीच्या मुंबई ऑफिसने सलग दुसऱ्या दिवशी अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावले
  • गुरुवारी दोन तास अनन्याची चौकशी

मुंबईः ड्रग केसमध्ये एनसीबीच्या मुंबई ऑफिसने सलग दुसऱ्या दिवशी अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यात झालेल्या चॅटवरुन एनसीबीला संशय आला आहे. यामुळे अनन्याची चौकशी होत आहे. Drug Case : Ananya Panday's chats reveal she agreed to arrange ganja for Aryan Khan, NCB quizzed Ananya

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चॅटमधून मोठा खुलासा झाला आहे. चॅट करताना अनन्याने आर्यनला मी गांजाची व्यवस्था करू शकेन, असे स्पष्ट सांगितल्याचे समजते. या प्रकरणात एनसीबी चौकशी करत आहे, तपास सुरू आहे.

अनन्याने एनसीबीच्या प्रश्नांना उत्तरे देताना मी आर्यनची चेष्टा करत होते, असे सांगितले. मी आणि आर्यन शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखतो असेही ती म्हणाली. पण अनन्याच्या उत्तरांनी एनसीबीचे समाधान झाले नसल्याचे समजते. 

एनसीबीने काल (गुरुवार २१ ऑक्टोबर २०२१) दोन तास अनन्याची चौकशी केली. यानंतर अनन्याला शुक्रवारी पुन्हा एकदा चौकशीला हजर व्हा असे सांगण्यात आले. याआधी आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणी ३० ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी झाली. तो सध्या मुंबई आर्थर रोड जेलमध्ये आहे. जामीन मिळवण्यासाठी आर्यनने मुंबईच्या उच्च न्यायालयात एक याचिका केली आहे. या याचिकेवर मंगळवार २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी