Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने शेण खाल्लं; उद्धव ठाकरेंची संतप्त टीका

मुंबई
Updated Feb 17, 2023 | 21:18 IST

शिवसेना ( Shiv Sena) आणि धनुष्यबाण (bow and arrow) निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने शेण खाल्लं अशी टीका उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर केली आहे.

थोडं पण कामाचं
  • निवडणूक आयोगाच्या निर्णायाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार
  • निवडणूक आयोगाचा हा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन 75 वर्षाचं स्वातंत्र्य संपलेलं आहे, असे जाहीर करावे.

Uddhav Thackeray Press conference :  शिवसेना ( Shiv Sena) आणि धनुष्यबाण (bow and arrow) निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने शेण खाल्लं अशी टीका उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर केली आहे. देशातील लोकशाही ही संपली असल्याची घोषणा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन अशीही टीका त्यांनी पत्रकार परिषदेवेळी केली आहे.  (Election Commission ate dung; Uddhav Thackeray's angry criticism )

अधिक वाचा  : INDvAUS:रविंद्र जडेजाचा फलंदाजीसह गोलंदाजीतही विक्रम

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या गटात पक्ष चिन्ह आणि पक्ष नावावरुन वाद सुरू होता. या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निर्णय देत शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि पक्ष चिन्ह दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरुन उद्धव ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा  :  IPL 2023 Schedule : IPL 2023 चे वेळापत्रक जाहीर

निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच हाच निर्णय द्यायचा होता तेव्हा आम्हाला इतकी कागदपत्र का जमा करायला लावली असा प्र्न करत आपण या निर्णयाविरुद्धात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.  

jl

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी