व्हॉट्सअॅप फॉरवर्ड, शिवसैनिकांची माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण

Ex-Navy official thrashed by ShivSena दीर्घकाळ देशसेवा करणाऱ्या माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली.

Ex-Navy official thrashed by ShivSena
शिवसैनिकांची माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण 

थोडं पण कामाचं

  • व्हॉट्सअॅप फॉरवर्ड, शिवसैनिकांची माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण
  • मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड
  • शिवसेनेने केली मारहाण - अतुल भातखळकर

मुंबईः कंगना आणि शिवसेना संघर्ष सुरू असताना एक धक्कादायक घटना मुंबईत घडली. दीर्घकाळ देशसेवा करणाऱ्या माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली (Ex-Navy official thrashed by ShivSena). एक व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड केला म्हणून शिवसैनिकांनी कायदा हाती घेऊन मारहाण केली. या प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात कमलेश कदम आणि त्याच्या ८-१० सहकाऱ्यांविरोधात मारहाण केल्याची एफआयआर दाखल झाली. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी 'टाइम्स नाऊ'शी बोलताना मारहाण प्रकरणी शिवसेनेला जबाबदार ठरवले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करुन मारहाण प्रकरणाला वाचा फोडली आहे. (mumbai shivsena workers attacked former navy officer for forwarding whatsapp message fir registered)

भातखळकर यांनी तिखट शब्दात शिवसेनेवर टीका केली. अभिनेत्री कंगना राणौत हिचे ऑफिस तोडून पौरुषत्व (मर्दानगी) दाखवणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने सत्तेच्या माजात एक माजी नौदल अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली, असा गंभीर आरोप भातखळकर यांनी केला. शिवसैनिकांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. मुख्यमंत्री घरात बसून हुकुमशाही चालवत आहेत, असेही भातखळकर म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तयार केलेले एक कार्टून व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना बेदम मारहाण केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. 

मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे. मदन शर्मा यांच्या डोळ्याला झालेली इजा त्यांच्याकडे बघताच सहज लक्षात येते. या संदर्भात आणखी माहिती मदन शर्मा यांच्या मुलाने दिली.

'राजकीय घडामोडींबाबत व्हॉट्सअॅपवर सतत मेसेजची देवाणघेवाण सुरू असते. जोक, कार्टून असा व्हायरल मजकूर व्हॉट्सअॅपवर धडकत असतो. माझे वडील मदन शर्मा यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर आलेला मेसेज फॉरवर्ड केला. त्यांच्या या कृतीनंतर अचानक त्यांना वारंवार फोन येऊ लागले. फोन करुन त्यांना बाहेर बोलावण्यात आले. बाहेर बोलवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांनी वडिलांना एकच प्रश्न केला. भाजपशी संबंधित आहात का?'; अशी माहिती मदन शर्मा यांच्या मुलाने दिली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या बाबतीत घडलेल्या धक्कादायक घटनेविषयी दुःख व्यक्त केले. एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड केला म्हणून बेदम मारहाण होणे ही दुर्दैवी, दुःखद आणि चकीत करणारी घटना आहे. सन्मानीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपण ही गुंडगिरी थांबवाल असे नमूद करत आणि थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करुन फडणवीस यांनी एक ट्वीट केले. त्यांनी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी